बिबट्याचा शोध ड्रोनद्वारे घ्यावा : जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST2021-06-22T04:19:20+5:302021-06-22T04:19:20+5:30
कसबे डिग्रज : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येेथे आठ दिवसांपूर्वी बिबट्या आढळला. पण त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. सध्या ...

बिबट्याचा शोध ड्रोनद्वारे घ्यावा : जाधव
कसबे डिग्रज : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येेथे आठ दिवसांपूर्वी बिबट्या आढळला. पण त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. सध्या पावसामुळे सर्वत्र पाणी असल्याने ड्रोन कॅमेराद्वारे या बिबट्याचा शोध घ्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक जाधव यांनी केली आहे.
कसबे डिग्रज, तुंग या गावात आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसामुळे या परिसरात असणाऱ्या शेताकडे शेतकरी फिरकलेले नाहीत. त्यामुळे बिबट्या कुणालाही दिसला नाही. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे कदाचित हा बिबट्या जवळपासच एखाद्या काटेरी वनस्पती असणाऱ्या जमिनीमध्ये असण्याची शक्यता आहे. वन विभागानेही या बिबट्याच्या शोध मोहिमेबाबत फारसं गांभीर्य दाखवलेलं नाही. या बिबट्याचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करावा आणि बिबट्याला पकडून सुरक्षितस्थळी सोडावे, अशी मागणी विनायक जाधव यांनी केली आहे.