करवसुलीसाठी पवनचक्क्यांना सील

By Admin | Updated: March 18, 2015 00:06 IST2015-03-17T23:19:52+5:302015-03-18T00:06:20+5:30

शिराळा पंचायत समितीची मोहीम : ६५ लाखांच्या थकित करप्रकरणी कारवाई

Seal the windmills for tax collection | करवसुलीसाठी पवनचक्क्यांना सील

करवसुलीसाठी पवनचक्क्यांना सील

विकास शहा - शिराळा पंचायत समितीमार्फत वसुली पथकाने ग्रामपंचायत करवसुलीसाठी ६ पवनचक्क्यांची कार्यालये सील केली. या १२९ पवनचक्क्यांकडे ६५ लाख रुपये कर थकित आहे. तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतींच्या २ कोटी ८३ लाख ७९ हजार ३० रुपयांच्या घरपट्टी, पाणीपट्टी कर वसुलीसाठी पंचायत समितीमार्फत पथके निर्माण केली आहेत. तालुक्यातील पश्चिम भागात १२९ पवनचक्क्या असून, यांच्याकडे २०१०-११ पर्यंत जुन्या दराने (२७५०० प्रति मेगावॅटप्रमाणे) ५७ लाख ६६ हजार ६७०, तर २०१२ ते १४-१५ या वर्षातील ७ लाख १ हजार अशी एकूण ६४ लाख ६७ हजार ६७० करवसुली थकबाकी आहे. या वसुलीसाठी आज मणदूर येथील एक, तर चरण येथील पाच पवनचक्क्यांची कार्यालये सील केली. यावेळी पथकप्रमुख एस. एल. सावंत यांच्यासह पथकातील कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. इतरही पवनचक्क्या सील करण्याची कारवाई चालूच राहणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी दीपाली पाटील यांनी दिली. याचबरोबर ९२ ग्रामपंचायतींच्या वसुलीसाठी एस्. एल. सावंत, ए. यु. पाटील, व्ही. पी. काळे, ए. के. साळुंखे, बी. आर. पाटील, अशोक वडार, राहुल बिरनाळे यांच्या नेतृत्वाखाली पाच पथके तयार केली आहेत. या सर्व ग्रामपंचायतींतर्फे २ कोटी ८३ लाख ७९ हजार ३० रूपये वसुली आहे. ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहकार्याने नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. आजअखेर या सर्व पथकांनी ८५ लाख १३ हजार ७०९ रूपये वसुली केली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी ग्रामपंचायतींना मिळण्यासाठी करवसुली महत्त्वाची आहे. त्यामुळे वसुली जोमात केल्याने गावांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे करवसुलीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी पाटील यांनी केले आहे.

मोहिमेत ८५ लाख वसूल
१२९ पवनचक्क्यांकडे ६५ लाख रूपये थकित
९२ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांकडे २ कोटी ८४ लाख रूपयांच्या थकित रकमेपैकी ५ वसुली पथकांद्वारे ८५ लाख रूपये मोहिमेत वसूल
१०० टक्के करवसुली झाल्यास गावाच्या विकासासाठी शासनाचा भरीव निधी मिळत असल्याने अनेक विकासकामे गावा-गावात होतील.
४पवनचक्क्या सील करण्याची कारवाई वेगात

Web Title: Seal the windmills for tax collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.