मुचंडी येथील शाळेत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:14 IST2020-12-28T04:14:40+5:302020-12-28T04:14:40+5:30

जत : मुचंडी (ता. जत) येथील न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या चार खोल्यांची कुलपे तोडून चोरट्यांनी चोरी ...

School robbery at Muchandi | मुचंडी येथील शाळेत चोरी

मुचंडी येथील शाळेत चोरी

जत : मुचंडी (ता. जत) येथील न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या चार खोल्यांची कुलपे तोडून चोरट्यांनी चोरी केली. शाळेसमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर, इन्व्हर्टची बॅटरी व शालेय पोषण आहार असा सुमारे ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक बसाप्पा महाजन यांनी शनिवारी रात्री उशिरा जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

मुचंडी गावालगत इंग्लिश स्कूलची इमारत आहे. रात्रीच्या वेळी तेथे कोणीही शिपाई अथवा रखवालदार मुक्कामास नसतो. याचा फायदा घेत चोरट्यांनी शाळेच्या पाच खोल्यांची कुलपे कटावणीने तोडली. एका खोलीत बसलेले सीसीटीव्हीचे डीव्हीआर, इन्व्हर्टरची बॅटरी व शालेय पोषण आहार असा सुमारे ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी सकाळी रखवालदार शाळेत गेल्यानंतर लक्षात आली. त्यांनी यासंदर्भात मुख्याध्यापक महाजन यांना माहिती दिली. यानंतर त्यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: School robbery at Muchandi