देवराष्ट्रेच्या यशवंतराव हायस्कूलमध्ये भरली आठवणींची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:29+5:302021-09-04T04:31:29+5:30

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतराव हायस्कूलमधील १९९० मध्ये दहावी झालेल्या बॅचचा ...

A school of memories at Yashwantrao High School in Devrashtra | देवराष्ट्रेच्या यशवंतराव हायस्कूलमध्ये भरली आठवणींची शाळा

देवराष्ट्रेच्या यशवंतराव हायस्कूलमध्ये भरली आठवणींची शाळा

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतराव हायस्कूलमधील १९९० मध्ये दहावी झालेल्या बॅचचा ‘ऋणानुबंध’ स्नेहमेळावा नुकताच पार पडला. ३१ वर्षांनंतर ६१ माजी विद्यार्थी एकत्र झाले आणि आठवणींमध्ये रमून गेले.

विद्यमान मुख्याध्यापक के. एच. पवार, पर्यवेक्षक पी. टी. मोरे यांच्याहस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. दहावीच्या १९९० च्या बॅचचे विद्यार्थी शरद उथळे व रूपाली शहा यांनी व्हॉट्स-ॲप ग्रुपच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित केले व पंधरा दिवसांतच हा स्नेहमेळावा घडवून आणला. या स्नेहमेळाव्याला ६१ विद्यार्थी जमले होते. शरद कुलकर्णी, व्ही. बी. पाटील, ए. आर. खोत, एम. वाय. देसाई, बी. के. शिंदे या शिक्षकांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. आर. बी. वाटेगावकर, बी. बी. जाधव, बी. पी. गुरव, एस. बी. मोरे, सौ. एम. डी. पवार या शिक्षकांची उपस्थिती होती. आनंदा जाधव, भरत जगदाळे, भारत पाटील, राजेंद्र महिंद, दत्तात्रय सपकाळ, रेखा पाटील, आक्काताई महिंद, वर्षाराणी पवार, योजना शिंदे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. हेमंत मोहिते यांनी आभार मानले. ब्रिजेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी महिंद, अधिक शंकर मोरे, अधिक निवृत्ती मोरे, भालचंद्र गोवंडे यांनी परिश्रम घेतले.

उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे वास्तव्यास असलेल्या शोभा कदम या विद्यार्थिनीने दोन दिवसांचा एकटीने रेल्वेप्रवास करून मेळाव्यास उपस्थिती लावली.

Web Title: A school of memories at Yashwantrao High School in Devrashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.