शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डफळापूर गटातील शाळा इमारती धोकादायक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 12:01 IST

डफळापूर जिल्हा परिषद गटात प्राथमिक शाळांच्या इमारतींकडे सांगली जिल्हा परिषदेकडून पूर्णत: दुर्लक्ष आहे. शाळेने वेळोवेळी दिलेले धोकादायक शाळा खोल्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून धुडकावून लावले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामुळे येथील शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या प्रकारामुळे पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देडफळापूर गटातील शाळा इमारती धोकादायक...शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

डफळापूर : डफळापूर जिल्हा परिषद गटात प्राथमिक शाळांच्या इमारतींकडे सांगली जिल्हा परिषदेकडून पूर्णत: दुर्लक्ष आहे. शाळेने वेळोवेळी दिलेले धोकादायक शाळा खोल्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून धुडकावून लावले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यामुळे येथील शेकडो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या प्रकारामुळे पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.जिरग्याळ, डफळापूर शाळा नं. १ व नाईक वस्ती शाळा येथे धोकादायक शाळा खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसू दिले जात नाही. या ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांसाठी जागा अपुरी आहे. त्याच शाळांमध्ये धोकादायक इमारती अखेरच्या घटका मोजत आहेत.

विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शाळेत वावरावे लागत आहे. जिरग्याळ येथे शाळेच्या आवारात चार खोल्यांची पडझड झाली आहे. डफळापूर गावात शाळा नं १ ची जागा अपुरी आहे. शाळेत धोकादायक इमारत आहे. या इमारतीच्या छताचा गिलावा पडत आहे.

यात विद्यार्थ्यांना बसवले जात नाही, परंतु जागाच अपुरी असल्याने मुलांना जीव मुठीत धरून वावरावे लागते. शाळा खोल्यांचे बांधकाम करत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले गेल्याने बांधकाम चांगले न झाल्याने या इमारती धोकादायक बनल्या असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित शाळा व व्यवस्थापन समितीने वेळोवेळी पाठपुरावा करूनही याकडे जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष आहे. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर जिल्हा परिषदेला जाग येणार का? असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे. धोकादायक इमारती शाळेच्या आवारातून त्वरित हटवून नवीन खोल्यांचे बांधकाम करावे, अशी पालकांची मागणी होत आहे.

टॅग्स :SchoolशाळाSangliसांगली