शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चिंचणीमध्ये भरली विठ्ठलनामाची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 19:07 IST

शाळकरी वारकरी... समवेत विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात बालके... असे भक्तिमय वातावरण होते. निमित्त होते आषाढी एकादशीचे..

ठळक मुद्देशिवाजी हायस्कूलमध्ये दिंडी आणि माऊलींची पालखी उत्साहात:अभुतपुर्व रिंगणसोहळा

प्रताप महाडिककडेगाव : हातात भगवा ध्वज... मुखात विठू नामाचा जयघोष... जोडीला टाळ-मृदंग... भजन करीत चाललेले शाळकरी वारकरी... समवेत विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात बालके... असे भक्तिमय वातावरण  होते. निमित्त होते आषाढी एकादशीचे , चिंचणी तालुका कडेगाव येथील शिवाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली आणि दिंडीमधून जनजागृती तर  केलीच पण यावेळी गावातील शिवाजी चौकात अभुतपुर्व रिंगणसोहळा संपन्न झाला .या सोहळ्यातील  नेत्रदीपक अश्वदौड तसेच बाल वारकऱ्यांच्या वेशभूषानी गावकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले.यामुळे येथे  अक्षरशः  विठ्ठल नामाची शाळा भरली होती .

टाळ मृदंगाच्या गजरात, ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष करीत  विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढली . या वेळी विठ्ठल-रुक्मिणी, सोपान, निवृत्ती, ज्ञानेश्वर, अशा वेशभूषेतील विद्यार्थी लक्ष वेधून घेत होते.शिवाजी हायस्कूलच्या मैदानात प्रारंभी रिंगण सोहळा संपन्न झाला आणि  दिंडी निघाली.माऊली माऊली नामाच्या जयघोषात मुख्याध्यापक व्ही एस बारामते यांचेसह शिक्षक व विद्यार्थ्यांनी  लिलया पालखी खांद्यावर घेतली आणि गावातील प्रमुख रस्त्याने  दिंडी काढण्यात आली.

दिंडीनंतर गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौकात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. यावेळी  मैदानावर पांडुरंगासह विविध संतांभोवती बाल वारकऱ्यांनी रिंगण केले.यावेळी  टाळमृदुंगाचा नाद व त्यातून निर्माण होणारे माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचे नादब्रह्म यामुळे माऊली व  विठ्ठल नामाने आसमंत व्यापून गेल्याची प्रचिती येत होती.नेत्रदीपक अश्वदौड:विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडी व माउलींच्या  पालखी सोहळ्यावेळी आकाशात ढगांनी गर्दी केली होती. कधी पाऊस कोसळत होता .याच उत्साहाच्या वातावरणात   दिंडीच्या ध्वजासह विद्यार्थ्यांनी  रिंगणाला २ प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि  अश्व दौड सुरू झाली. यावेळी उपस्थित विद्यार्थी व  गावकऱ्यांनी  माऊलीऽऽ माऊलीऽऽ नामाचा जयघोष करून हा रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठवित सोहळ्याचा आनंद लुटला. यावेळी अश्वदौड नेत्रदीपक झाली पण अश्वाला आवरताना सेवकांची मात्र दमछाक झाली.दरम्यान मुलींचा फुगडीचा खेळही रंगला होता .

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळा