दीड वर्षांच्या सुट्टीनंतर आजपासून वाजणार शाळांची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:56 IST2021-09-02T04:56:19+5:302021-09-02T04:56:19+5:30
सांगली : शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिले आहेत. त्यानुसार ...

दीड वर्षांच्या सुट्टीनंतर आजपासून वाजणार शाळांची घंटा
सांगली : शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या संमतीने शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात काही गावांत आज, बुधवारपासून वर्ग सुरू होत आहेत.
शुक्रवारी (दि. २७) झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत तसा निर्णय झाला होता. त्यानुसार स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची संमती घेऊन वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार कांबळे यांनी आदेश जारी केले. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून ऑफलाईन पद्धतीने वर्ग सुरू करावेत. शिक्षकांची उपस्थिती १०० टक्के ठेवावी. दरम्यान, या आदेशांनुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी आजपासून शाळा सुरू होत आहेत. गावात कोरोनाचे रुग्ण असल्यास शाळा सुरू करण्याविषयीचा निर्णय स्थानिक व्यवस्थापन समितीने घ्यायचा आहे.
दरम्यान, जिल्ह्याची रुग्णसंख्या सध्या अत्यंत कमी आहे. गेल्या दोन दिवसांतील रुग्णसंख्या ३५० पेक्षा कमी आहे. अनेक गावांत रुग्ण अस्तित्वात नाही. त्यामुळे बहुतांश गावांत शाळा सुरू होण्याची अपेक्षा आहे. काही छोट्या गावांत यापूर्वीच शाळा सुरू झाल्या आहेत.