जिल्ह्यातील ४८० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:31 IST2021-08-21T04:31:42+5:302021-08-21T04:31:42+5:30
सांगली : केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील आठवीच्या विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा घेऊन त्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. प्रत्येक ...

जिल्ह्यातील ४८० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सांगली : केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील आठवीच्या विद्यार्थ्यांची दरवर्षी परीक्षा घेऊन त्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बारावी परीक्षेपर्यंतच्या शिक्षणासाठी बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्यातील ४८० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली.
कांबळे म्हणाले की, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जिल्ह्यातून पाच हजार ८८२ विद्यार्थी बसले होते. या परीक्षेतून ४८० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यातील ३६, जत ७, कवठेमहांकाळ ५७, मिरज ८९, खानापूर १४, पलूस ३२, शिराळा १५, तासगाव १२६, तर वाळवा तालुक्यातील ६३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी बारा हजार रुपये मिळणार आहेत.