शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

इस्लामपूरच्या सखींनी अनुभवला चैतन्य व सौख्याचा सागर

By admin | Updated: December 2, 2014 23:34 IST

‘लोकमत’ सखी मंच : आनंद कृषी पर्यटन केंद्राची सहल

इस्लामपूर : स्त्रीसुलभ मनातील भाव-बंधनांचा कल्लोळ बाजूला सारत ‘लोकमत’ सखी मंच सदस्यांनी बालपणीच्या आठवणींना कवेत घेत शिवारफेरी मारली. त्यासोबतच रेन डान्स, पोहणे, बोटिंग, झोपाळा, झुलता पूल, घोडेस्वारी, नेमबाजी, खो-खो, क्रिकेट अशा अनेकविध खेळांची डीजेच्या ठेक्यात आनंदात लयलूट केली. युवती, माता, आजी अशा वयाच्या भूमिकेत असणाऱ्या सखींनी आनंद कृषी पर्यटनातल्या या धमाल विरंगुळ्यातून मिळालेला आनंद मनाच्या कोंदणकुपीत साठवून ठेवत चैतन्य अन् सौख्याचा सागर अनुभवला.‘लोकमत’ सखी मंचतर्फे सखी सदस्यांसाठी बोरगाव (सातारा) येथील आनंद कृषी पर्यटन केंद्राची सहल काढण्यात आली. रविवारी सकाळी निघालेली ही सहल गाण्यांच्या भेंड्या, विनोद अशा धम्माल मौजमस्तीत आनंद केंद्रावर पोहोचली. तेथे गणेश दर्शन आणि चहा, नाश्ता घेऊन सखींच्या बालपणाचा आविष्कार सुरू झाला, तो तब्बल दिवसभर.जगजितसिंह यांच्या गझलेतील ‘‘ए दौलत भी ले लो, ए शोहरत भी ले लो, भले छिन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो वो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारीश का पानी’’ या भावस्पर्शी ओळी सत्यात उतरवत सखी सदस्या डीजेच्या धमाक्यात रेन डान्समध्ये भिजल्या अन् थिरकल्याही. कागदी नावेप्रमाणे पाण्यावर तरंगणाऱ्या बोटीत विसावल्या. श्रावणातील झोपाळ्यावर झुलल्या. पाण्यात मनसोक्त पोहल्या. बालवयातील, तरुणपणातील सगळ्या आवेगाला पाण्यात झोकून देत पुन्हा ‘त्या’ चैतन्यदायी जीवनाची अनुभूती घेतली.गानकोकीळा लता मंगेशकर यांनी गायिलेल्या ‘सूर की नदीया हर दिशासे बहते सागर से मिले, बादलो का रूप लेके बरसे हलके, हलके.., ओ मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा...’ या काव्यपंक्तीचा आवेश घेत सखींनी आपल्या नानाविध वेशभूषा, रंगभूषा, करून विविधतेत एकता, असा जणू संदेशच दिला. दमल्या-भागल्या सखी झाडाखाली विसावल्या, तर जोषात असणाऱ्या सखी खो-खो अन् क्रिकेट खेळल्या. काही सखी झोपाळ्यावरून घसरल्या आणि पुन्हा सावरल्याही. शिवारफेरी मारताना बैलाचा दोर हातात घेऊन फॉरेनच्या पाटलीणीसारख्या शिवारात फिरल्या. चिमणी-पाखरं, कबुतरे, खारुताईच्या विश्वात रमल्या.जवळपास सात तासांच्या धम्माल मौज-मस्तीनंतर मनसोक्तपणे भोजनाचा आस्वाद घेतला. आईस्क्रिमचा सिप घेताना कॅरमवर स्ट्राईकरही धरला. आनंद कृषी पर्यटन केंद्रातील ही अविस्मरणीय मैफल पुन्हा परतीच्या प्रवासाला लागली, ती ‘वो मासूम चहत की तस्वीर अपनी, वो ख्वाबो खिलौनौं की जागीर अपनी, न दुनिया का गम था न रिश्तों के बंधन, बडी खुबसूरत थी वो जिंदगानी’ अशा ओळी गुणगुणत सखींनी चिरतरुण मनाने ‘लोकमत’ परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आनंद कृषी पर्यटनचे संचालक आनंदराव शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सखींना मार्गदर्शन केले. जवळपास ९० सखी सदस्यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)