शिराळामध्ये खवले मांजर आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:21+5:302021-07-17T04:21:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा वनपरिक्षेत्र हद्दीमध्ये गुरुवार, दि. १५ रोजी रात्री खवले मांजर आढळले होते. वन विभाग ...

शिराळामध्ये खवले मांजर आढळले
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा वनपरिक्षेत्र हद्दीमध्ये गुरुवार, दि. १५ रोजी रात्री खवले मांजर आढळले होते. वन विभाग व प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.
खवले मांजर आढळल्यावर वाटेगाव येथील सर्पमित्र गणेश निकम यांना ग्रामस्थांनी कळवले. त्यानंतर त्यांनी वन विभागाला कळवून ते ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खवले मांजराला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. हे खवले मांजर पूर्णपणे वाढ झालेले होते.
शिराळा तालुक्यातील पश्चिम आणि पूर्व भाग हा खवले मांजराचा अधिवास आहे. कोणत्याही नागरिकांना अशाप्रकारे खवले मांजर अथवा इतर वन्यजीव आढळल्यास तत्काळ वन विभाग अथवा प्लॅनेट अर्थ फाऊंडेशनच्या सदस्याना कळवावे. या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडताना संस्थेचे सदस्य गणेश निकम, प्राणीमित्र मीनाक्षी गणेश निकम, संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव महाजन, प्रोजेक्ट असिस्टंट प्रथमेश शिंदे, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक दीपाली सागावकर, अनिल पाटील, अंकुश खोत आदी उपस्थित होते. यासाठी वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांचे मार्गदर्शन मिळाले.