सुनीता माने यांना सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:32+5:302021-02-10T04:25:32+5:30

संजयनगर : कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे सांगलीतील राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता माने यांना प्रा. नंदा पाटील यांच्या हस्ते ...

Savitrimai Phule Adarsh Shikshika Award to Sunita Mane | सुनीता माने यांना सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार

सुनीता माने यांना सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार

संजयनगर : कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे सांगलीतील राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता माने यांना प्रा. नंदा पाटील यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने गाैरविण्यात आले.

मिरज येथील आयएमए हॉल येथे हा कार्यक्रम झाला. कास्ट्राइब संघटनेचे महासचिव नामदेव कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नामदेव कांबळे म्हणाले, हा पुरस्कार समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया असलेल्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान व समाजाचा आणि राष्ट्राचा विकास व्हावा, यासाठी समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षिकांना देण्यात येतो. अशा पुरस्कारातून समाजाला प्रेरणा मिळते, अशा प्रेरणेतून समाज सबल होतो. गणेश मडावी यांनी प्रास्ताविक केले. बाजीराव प्रज्ञावंत यांनी आभार मानले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र टोणे, विद्याधर रास्ते, दयानंद सरवदे उपस्थित होते.

फाेटाे : ०९ दुपटे १

Web Title: Savitrimai Phule Adarsh Shikshika Award to Sunita Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.