भिलवडी स्टेशनच्या सरपंचपदी सावित्री यादव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:01+5:302021-03-04T04:51:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिलवडी : भिलवडी स्टेशन (ता. पलूस) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सावित्री यादव यांची, तर उपसरपंचपदी राजेश जाधव यांची ...

भिलवडी स्टेशनच्या सरपंचपदी सावित्री यादव
लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : भिलवडी स्टेशन (ता. पलूस) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सावित्री यादव यांची, तर उपसरपंचपदी राजेश जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कृषी अधिकारी रमेश सकटे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामपंचायत निवडणुकीत काॅंग्रेसचे नऊपैकी नऊ सदस्य बिनविरोध निवडून आले.
सावित्री यादव म्हणाल्या की, सर्व सदस्य व नेते नंदकुमार कदम यांच्या विश्वासास पात्र राहून गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
तसेच राजेश जाधव यांनी, गावाच्या विकास कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा नागरिकांच्यावतीने सत्कार करण्यात आला. माजी सरपंच नंदकुमार कदम, ग्रामसेविका मनीषा कांबळे, संभाजी काळे, जयकर जाधव, विलास यादव, जगन्नाथ जाधव, विश्वनाथ माळी, सर्जेराव जाधव, हणमंत यादव, जालिंदर जाधव, शिरीष पवार, मोहन अग्रवाल, दामोदर कुलकर्णी, बाबूराव बुधे, रितेश कांबळे, युवराज माळी आदी उपस्थित होते.