भिलवडीच्या सरपंचपदी सविता महिंद-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:16 IST2021-02-20T05:16:12+5:302021-02-20T05:16:12+5:30

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील सरपंचपदी सौ. सविता महिंद-पाटील यांची, तर उपसरपंचपदी पृथ्वीराज यशवंत पाटील यांची बिनविरोध ...

Savita Mahinda-Patil as Sarpanch of Bhilwadi | भिलवडीच्या सरपंचपदी सविता महिंद-पाटील

भिलवडीच्या सरपंचपदी सविता महिंद-पाटील

भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील सरपंचपदी सौ. सविता महिंद-पाटील यांची, तर उपसरपंचपदी पृथ्वीराज यशवंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

कृषी सहायक अजित साळुंखे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसप्रणित पॅनेलने सतरापैकी तेरा जागा जिंकून सत्तांतर केले होते. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, माजी सरपंच शहाजी गुरव, बी. डी. पाटील, चंद्रकांत पाटील, विलास पाटील, खंडूआण्णा शेटे, दादा चौगुले, बाळासाहेब मोरे, आस्लम सुतार, ग्रामसेवक अजित माने, तलाठी गौसमहंमद लांडगे आदी उपस्थित होते.

फोटो- भिलवडीच्या सरपंच सौ. सविता महिंद-पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील यांचा सत्कार करताना संग्राम पाटील, शहाजी गुरव, चंद्रकांत पाटील आदी.

Web Title: Savita Mahinda-Patil as Sarpanch of Bhilwadi