आवंढीत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:48+5:302021-06-09T04:34:48+5:30
महादेव पवार यांच्या शेतातील विहिरीत शनिवारी कोल्हा शिकारीचा पाठलाग करताना किंवा अन्नाच्या शोधात पडला होता. पवार विहिरीकडे गेल्यावर दिसून ...

आवंढीत विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान
महादेव पवार यांच्या शेतातील विहिरीत शनिवारी कोल्हा शिकारीचा पाठलाग करताना किंवा अन्नाच्या शोधात पडला होता. पवार विहिरीकडे गेल्यावर दिसून आले. विहिरीत बारा ते पंधरा फूट पाणी असल्याने कोल्हा पाण्यात पोहत होता. ओरडत होता. पवार व स्थानिक नागरिकांनी जत वनविभागाशी संपर्क साधला व घटनेची माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत पिंजरा, दोर व इतर साहित्य घेऊन घटनास्थळ गाठले.
रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने कोल्ह्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. पिंजऱ्यात घालून जत येथील अंबिका मंदिर परिसरातील वनक्षेत्र अधिवासात सोडून दिले. बीट वनपाल गडदे, वनरक्षक महादेवमुसळे, कर्मचारी भारत कोडग यांनी स्थानिकांच्या मदतीने ही मोहीम फत्ते केली.
फोटो ओळ : जत तालुक्यातील आवंढीतील शिंदेवाडी येथील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढले.