आष्ट्यातील बालकाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST2021-06-25T04:20:06+5:302021-06-25T04:20:06+5:30
आष्टा येथील डॉ. सचिन पाटील यांच्यासोबत रुद्र व त्याचे आई-वडील. सुरेंद्र शिराळकर लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा येथील ...

आष्ट्यातील बालकाला जीवदान
आष्टा येथील डॉ. सचिन पाटील यांच्यासोबत रुद्र व त्याचे आई-वडील.
सुरेंद्र शिराळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा येथील रुद्र रवींद्र खोत या दीड वर्षाच्या बालकाला कोरोनाची लागण झाली. आष्टा पालिकेचे अधिकारी सचिन मोरे, आसावरी सुतार यांनी आवाहन करताच या बालकाच्या मदतीला हजारो हात धावले व एका रात्रीत ५० हजार रुपये जमा झाले. सर्वांच्या प्रयत्नामुळे बालकावर वेळेत उपचार झाल्याने त्याला जीवदान मिळाले.
रवींद्र खोत यांना कोरोनाची लागण झाली. पाठोपाठ त्यांची पत्नी व दीड वर्षाचा मुलगा रुद्र हा कोरोना पॉझिटिव्ह आला. याची माहिती मोरे यांना मिळताच त्यांनी तातडीने सदिच्छा बाल रुग्णालयात दाखल केले. सचिन मोरे यांनी मान्यवरांना यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. याला प्रतिसाद मिळत सुमारे ५० हजाराच्या दरम्यान मदत मिळाली.
डॉ. सचिन पाटील यांनी रुद्रवर उपचार केले. कोणतेही अतिरिक्त पैसे घेतले नाही. सचिन मोरे, असावरी सुतार यांच्यासह डॉक्टरांनी वेळेवर मदत केली. रुद्रवर वेळेत उपचार झाल्याने आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.