शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

सातारकरांनी ओलांडली भीमा नदी मुख्यमंत्री देणार खेड गावाला भेट : गावकुसाबाहेरच्या २४ कुटुंबांना मिळालं हक्काचं घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 1:02 AM

स्वप्निल शिंदे।सातारा : वेण्णा नदीवर गावकुसाबाहेर राहणाºया कातकरी समाजाच्या तब्बल २४ कुटुंबीयांना सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीने आपले हक्काचे घर बांधून दिले. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील भीमा नदी ओलांडून घोडेगावच्या आदिवासी केंद्रातून पदाधिकाºयांनी दुर्मीळ दाखलेही आणले.एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात शबरी आदिवासी घरकूल योजना प्रभावी राबवल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली ...

स्वप्निल शिंदे।सातारा : वेण्णा नदीवर गावकुसाबाहेर राहणाºया कातकरी समाजाच्या तब्बल २४ कुटुंबीयांना सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीने आपले हक्काचे घर बांधून दिले. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील भीमा नदी ओलांडून घोडेगावच्या आदिवासी केंद्रातून पदाधिकाºयांनी दुर्मीळ दाखलेही आणले.

एकाच गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात शबरी आदिवासी घरकूल योजना प्रभावी राबवल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून, लवकरच ते या गावाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. सातारा शहरालगतच असलेले खेड हे गाव वेण्णा नदीच्या काठी वसले आहे. शहरालगत गाव असल्याने औद्योगिकीकरण आणि दिवसेंदिवस इमारतीची संख्या वाढत आहे.

शहरीकरणामुळे गावचा विकास होत असताना गावात असणारा कातकरी समाज आजही या विकासापासून कोसोदूर होता. वेण्णा नदीत मासेमारी करून आजही आपला उदरनिर्वाह करत आहे. गावाच्या एका बाजूला असलेला कातकरी समाज आपल्या पालात राहत होता. हे पाल म्हणजे एक झोपडीच.

गावातील तब्बल ५६० जणांना ऊन, वारा आणि पाऊस या तिन्ही ऋतुंमध्ये याच ठिकाणी राहावे लागत होते. त्यामुळे त्यांना हक्काचे पक्के घर मिळावे, यासाठी खेड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच मिलिंद कदम यांनी पुढाकार घेतला. योजनेचा लाभ घ्यायचा तर कागदपत्रे, घर बांधण्यासाठी जागा आदी प्रश्न होतेच. या कातकरी समाज अशिक्षित असल्याने त्यांच्याकडे कोणत्याही स्वरुपाची कागदपत्रे नव्हती, त्यामुळे त्यांना त्यापासून वंचित राहावे लागणार होते. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

मग ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वखर्चातून त्यांचे जातीचे दाखले व इतर कागदपत्रे मिळवले. तसेच जिल्हाधिकाºयांच्या मालकीची जागा उपलब्ध करून शबरी योजनेचे आवश्यक ते प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवले. त्यापैकी शासनाने २४ प्रस्ताव मंजूर केले. ग्रामपंचायतीच्या मदतीने १ लाख ३२ हजार रुपयांचा निधी खर्चून शौचालयसह मोफत पक्के घर बांधून देण्यात आले. आज कातकरी वस्तीमध्ये २४ जणांची सुसज्ज अशी पक्की घरे दिमाखात उभी आहेत.

मुख्यमंत्र्यांची घेणार भेटग्रामपंचायतीने फक्त घरं दिली नाहीत तर घरासोबत सिमेंटचे रस्ते, नळ पुरवठा योजनेतून पाणी तसेच वीजही उपलब्ध करून दिली आहे. वस्तीच्या बाजूने संरक्षित भिंत, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह आणि मुलांसाठी जिल्हा परिषदेची शाळा अशा सोयीसुविधा उभारून खºया अर्थाने त्यांच्या २४ जणांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. त्यामुळे या वस्तीतील लोकही होय, मी लाभार्थी असे म्हणून लागले आहेत.खेड ग्रामपंचायतीने योजना राबवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, १८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत. 

गावातील बहुसंख्य लोकांना हक्काचे घर मिळवून दिले आहे. त्यापैकी १३ जण अजून वंचित आहेत. त्यांचे आदिवासी दाखले नसल्याने अडचण आहे; पण लवकरच त्यांनाही हक्काचे घर मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.-मिलिंद कदम, सभापती, सातारा पंचायत समितीकातकरी समाजाकडे घरासाठी जागा, उत्पन्नाचे दाखले, आदिवासी दाखले, वारस नोंद नव्हती. यासाठी ग्रामपंचायतीने सकारात्मक भूमिका घेत कागदपत्रे स्वत: गोळा केली. त्यानंतर चोवीस कुटुंबांची योजना पर्ू्ण केली. लवकरच उर्वरित तेरा जणांना पक्के घर बांधूून देऊन शंभर टक्के योजना राबविण्याचा प्रयत्न आहे.- ज्ञानेश्वर गायकवाड, ग्रामसेवकआम्ही अनेक वर्षांपासून झोपडीत राहत होतो. आम्हाला वाटलेही नव्हते कधी आम्ही हक्काच्या घरात जाऊ; पण शबरी योजनेतून आम्हाला घराचे घर मिळाले.- नंदू अंतू पवार,लाभार्थी