राष्ट्रीय समाज पक्षाच्या आटपाडी तालुकाध्यक्षपदी सत्यजित गलांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:18 IST2021-06-23T04:18:11+5:302021-06-23T04:18:11+5:30
करगणी : राष्ट्रीय समाज पक्षाच्या सांगली जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी तालुक्यातील नूतन पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या. ...

राष्ट्रीय समाज पक्षाच्या आटपाडी तालुकाध्यक्षपदी सत्यजित गलांडे
करगणी : राष्ट्रीय समाज पक्षाच्या सांगली जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर यांच्या अध्यक्षतेखाली आटपाडी तालुक्यातील नूतन पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या. तळेवाडीचे युवक कार्यकर्ते सत्यजित गलांडे यांची आटपाडी तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी सुहास सरगर याची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय समाज पक्षाची पदाधिकारी निवडप्रक्रिया बानूरगड येथील बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळ पार पडली. यावेळी आटपाडी तालुका युवक अध्यक्ष म्हणून ब्रह्मदेव गायकवाड, उपाध्यक्ष विशाल सरगर काळे, करगणी जिल्हा परिषद गट अध्यक्षपदी बनपुरीचे दाजी यमगर याची निवड करण्यात आली. यावेळी उमाजी सरगर, अरुण झंजे, कालिदास गाढवे, देवा खरात, लखन व्हनमाणे, उत्तम काळे, अरुण निळे, आण्णा कांबळे, ग्रामपंचायत सदस्य भगवान म्हारगुडे, उपसरपंच दादासाहेब डोंबाळे उपस्थित होते.