कोकरुड येथे मान्यवरांकडून सत्यजित देशमुख यांचे सांत्वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST2021-09-15T04:30:52+5:302021-09-15T04:30:52+5:30

कोकरूड : कोकरूड (ता. शिराळा) येथील सरोजनी शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांचे भारतीय ...

Satyajit Deshmukh's condolences from dignitaries at Kokrud | कोकरुड येथे मान्यवरांकडून सत्यजित देशमुख यांचे सांत्वन

कोकरुड येथे मान्यवरांकडून सत्यजित देशमुख यांचे सांत्वन

कोकरूड : कोकरूड (ता. शिराळा) येथील सरोजनी शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट घेऊन सांत्वन केले.

आमदार मोहनराव कदम, आमदार विनय कोरे, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे, आमदार विक्रम सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी आमदार सदाशिवराव पाटील, जयश्रीताई पाटील, कऱ्हाडचे युवा नेते उदयसिंह उंडाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे शाहूवाडीचे नेते मानसिंग गायकवाड, ‘गोकुळ’चे संचालक करण गायकवाड, माणिक पाटील-चुयेकर, माजी महापौर इद्रिस नायकवडी, किशोर शहा, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, अभिजित पाटील, सम्राट महाडिक, गौरव नायकवडी, आनंदराव पवार, अरुण बालटे, सुरेंद्र वाळवेकर, जितेंद्र पाटील, ब्रम्हानंद पडळकर, नितीन नवले, विशाल चौगुले, सुरेखा जाधव, अश्विनी नाईक, विजय पाटील, बी. के. पाटील, झुंझारराव पाटील, सागर खोत, श्रीरंग पाटील, खंडेराव जाधव, सुनीतादेवी नाईक, वैशाली माने, नंदाताई पाटील, मनीषा गुरव, सारिका पाटील, नगराध्यक्षा सुनीता निकम, शशिकांत पाटील, वीराज शिंदे, भीमराव पाटील, युवराज सूर्यवंशी, तानाजी सावंत, अमरसिंह नाईक, राजेंद्र नाईक, व्ही. टी. पाटील, संग्राम फडतरे, सूर्यकांत पाटील, अभिजित आंदळकर, प्रा. वैजनाथ महाजन, प्रा. प्रदीप पाटील, अमर थोरात, संग्राम नलवडे, सर्जेराव यादव, रावसाहेब भोसले यांनी सत्यजित देशमुख यांची भेट घेऊन सांत्वन केले.

फोटो : १४ काेकरुड १

ओळ : कोकरूड (ता. शिराळा) येथे सरोजनी देशमुख यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केेले. यावेळी सत्यजित देशमुख, संपतराव देशमुख, सुजित देशमुख उपस्थित हाेते.

Web Title: Satyajit Deshmukh's condolences from dignitaries at Kokrud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.