शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
2
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
3
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
4
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
5
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
6
"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली
7
Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
8
५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे
9
मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस
10
Usha Thakur : "पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही...
11
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
12
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
13
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
14
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
15
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
16
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
17
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
19
MI Playoff Scenario: ७ सामने, ३ विजय आणि ६ गुण, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला किती लढती जिंकाव्या लागतील? असं आहे गणित
20
‘लिव्हिंग विल’ पुनर्प्राप्तीसाठी चार महिन्यांत यंत्रणा तयार करा, उच्च  न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Sangli News: शिराळ्यात सत्यजीत देशमुख-सम्राट महाडिक 'साथ-साथ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:17 IST

आमच्यात दुफळी असल्याची विरोधकांकडून अफवा पसरवली जात आहे. मात्र या कार्यक्रमाची उपस्थिती विरोधकांना चपराक देणारी

शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजीत देशमुख आणि सम्राट महाडिक यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, दोघेही एकत्रच काम करीत आहेत व करणार आहेत. या दोघांच्या एकत्रितपणा तुन येथील विकास कामे पूर्ण होतील असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. यावेळी त्यांनी शिराळा नागपंचमी व छत्रपती संभाजी महाराज स्मृतिस्थळ विकसित करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.भाजपच्या लोकसभा प्रवास अभियान अंतर्गत आयोजित लाभार्थी सवांद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजीत देशमुख, भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री सिंधिया म्हणाले की, या अगोदर अनेक वर्षांपासून या देशावर भ्रष्टाचारी शासन होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज भारत ही विश्वाची औषध बनवणारी राजधानी ठरली आहे .आपला देश२०३० पर्यंत जगातील पाचव्या क्रमांकाचा आर्थिक शक्तिशाली देश बनेल. शिराळ्याची भूमी संकल्प आणि बलिदानाची भूमी आहे. या परिसराचा विकास करण्याचे आमचे ध्येय आहे. शिराळ्याच्या नागपंचमी बाबत पर्यावरण मंत्री यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन. भुईकोट किल्ल्यावर श्री छत्रपती संभाजी महाराज स्मृतिस्थळ विकसित करण्यासाठी सहकार्य करीन असे सांगितले.सत्यजीत देशमुख म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज स्मृतिस्थळ विकसित करण्यासाठी व नागपंचमी पारंपरिक पद्धतीने साजरी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अंत्योदय योजनेची उत्पन्नाची मर्यादा वाढवावी अशी मागणी केली.सम्राट महाडिक यांनी, आगामी सर्व निवडणूकीत सत्यजीत देशमुख व आम्ही एकत्रित काम करून विजय मिळवू.आमच्यात दुफळी असल्याची विरोधकांच्या कडून अफवा पसरवली जात आहे मात्र या कार्यक्रमाची उपस्थिती ही विरोधकांना चपराक आहे असे सांगितले.यावेळी मकरंद देशपांडे , जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, संपतराव देशमुख, माजी नगरसेवक केदार नलवडे, रणजितसिंह नाईक, समरजित घाटगे, निशिकांत पाटील, सी बी पाटील आदी. उपस्थित होते.विरोधकांना चपराक : सम्राट महाडिकमहाडिक म्हणाले, आगामी सर्व निवडणुकीत सत्यजित देशमुख व आम्ही एकत्रित काम करुन विजय मिळवू, आमच्यात दुफळी असल्याची विरोधकांकडून अफवा पसरवली जात आहे. मात्र या कार्यक्रमाची उपस्थिती विरोधकांना चपराक देणारी आहे.

टॅग्स :Sangliसांगलीshirala-acशिराळाSatyajit Deshmukhसत्यजित देशमुखPoliticsराजकारण