धनगावच्या सरपंचपदी सतपाल साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:51+5:302021-02-17T04:32:51+5:30

भिलवडी : धनगाव (ता. पलूस) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सतपाल साळुंखे यांची, तर उपसरपंचपदी कुसुम साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. ...

Satpal Salunkhe as Sarpanch of Dhangaon | धनगावच्या सरपंचपदी सतपाल साळुंखे

धनगावच्या सरपंचपदी सतपाल साळुंखे

भिलवडी

: धनगाव (ता. पलूस) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सतपाल साळुंखे यांची, तर उपसरपंचपदी कुसुम साळुंखे

यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रोहन भोसले यांनी कामकाज पाहिले.

ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पॅनेलने नऊपैकी सहा जागा जिंकून सत्तांतर केले होते. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन आपण कार्यरत राहू, असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच सतपाल साळुंखे यांनी केले.

नागरिकांच्यावतीने नूतन सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप यादव, आशा केवळे, हणमंत यादव, काजल मदने आदी ग्रामपंचायत सदस्यांसह माजी सरपंच वसंतराव पवार, उदय साळुंखे, दत्तात्रय यादव, शामराव साळुंखे, विष्णुपंत कुर्लेकर, माणिक तावदर, रवींद्र साळुंखे आदी उपस्थित होते.

फोटो : १६ सतपाल साळुंखे

फाेटाे : १६ कुसुम साळुंखे

Web Title: Satpal Salunkhe as Sarpanch of Dhangaon