सतीश पाटील यांचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:30 IST2021-02-09T04:30:14+5:302021-02-09T04:30:14+5:30

आष्टा : पोखर्णी (ता. वाळवा) येथील अशोका ॲग्रो उद्योगसमूहाचे संस्थापक डॉ. सतीश पाटील यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने मानद ...

Satish Patil felicitated by NCP | सतीश पाटील यांचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार

सतीश पाटील यांचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार

आष्टा : पोखर्णी (ता. वाळवा) येथील अशोका ॲग्रो उद्योगसमूहाचे संस्थापक डॉ. सतीश पाटील यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल वाळवा तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्रामसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संग्रामसिंह पाटील म्हणाले, सतीश पाटील यांनी ग्रामीण भागात अशोका ॲग्रो उद्योगसमूहाची स्थापना करून सेंद्रिय खते तयार करून ती शेतकऱ्यांना बांधावर उपलब्ध करून दिली आहेत. सतीश पाटील यांना मिळालेला पुरस्कार हा शेतकऱ्यांचा गौरव वाढवणारा आहे.

यावेळी ‘सर्वोदय’चे संचालक नंदकुमार पाटील, डॉ. पी.एम. पाटील, सरपंच रेखाताई पाटील, प्रतीक पाटील, बिभीषण पाटील, गुंडाभाऊ पाटील उपस्थित होते.

फोटो-०८आष्टा४

फोटो : पोखर्णी (ता. वाळवा) येथे डॉ. सतीश पाटील यांचा संग्रामसिंह पाटील यांनी सत्कार केला. यावेळी नंदकुमार पाटील, डॉ. पी.एम. पाटील, प्रतीक पाटील उपस्थित होते.

Web Title: Satish Patil felicitated by NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.