कृष्णा व्हॅली चेंबरच्या अध्यक्षपदी सतीश मालू

By Admin | Updated: May 28, 2015 00:56 IST2015-05-28T00:36:26+5:302015-05-28T00:56:40+5:30

संचालकांचा सत्कार : उद्योजकांच्या समस्यांच्या सोडवणुकीचे आश्वासन

Satish Malu, President of Krishna Valley Chamber | कृष्णा व्हॅली चेंबरच्या अध्यक्षपदी सतीश मालू

कृष्णा व्हॅली चेंबरच्या अध्यक्षपदी सतीश मालू

कुपवाड : कुपवाड एमआयडीसीमधील कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी सतीश मालू यांची, तर उपाध्यक्षपदी पांडुरंग रूपनर आणि रमेश आरवाडे, सचिवपदी चंद्रकांत पाटील यांची बुधवारी निवड करण्यात आली.
चेंबरचे गटनेते शिवाजी पाटील, समृध्दी ग्रुपचे प्रमोद मालू, प्रमोद सारडा, उमेश बगाडीया, महावीर मालाणी, अशोक कोठावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडीनंतर सत्काराचा कार्यक्रम झाला.
यावेळी शिवाजी पाटील म्हणाले की, कुपवाड एमआयडीसीमधील उद्योजकांच्या औद्योगिक महामंडळाकडे अडकलेल्या अग्निशामन करासह इतर अनेक प्रश्नांची सोडवणूक कृष्णा व्हॅली चेंबरच्या माध्यमातून केली आहे. यापुढेही कुपवाड एमआयडीसीसह येथील उद्योजकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. कृष्णा व्हॅली चेंबरने यापूर्वीपासून उद्योजकांच्या हितासाठी व चेंबरचा नावलौकिक वाढविण्यासाठी काम केले आहे. संस्थेमध्ये कोणतेही राजकारण केले नाही. चेंबरला गालबोट लागेल, असे कोणतेही कृत्य यापूर्वी केले नाही.
उद्योगपती शहाजीराव जगदाळे म्हणाले की, कृष्णा व्हॅली चेंबर ही नावलौकिक मिळविलेली संस्था आहे. याठिकाणी निवडून येणाऱ्यांनी उद्योजकांच्या विकासाबरोबरच उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. त्यांना आमचे सहकार्य असेल.
प्रकाश चव्हाण म्हणाले की, नूतन संचालक मंडळाने चेंबरमध्ये एकोपा ठेवावा. विरोधकांना बरोबर घेऊन काम करावे.
नूतन अध्यक्ष सतीश मालू म्हणाले की, एमआयडीसीमधील सर्व उद्योजकांना बरोबर घेऊन चेंबरचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
याप्रसंगी नूतन अध्यक्ष मालू, उपाध्यक्ष पांडुरंग रूपनर, उपाध्यक्ष रमेश आरवाडे, सचिव चंद्रकांत पाटील, संचालक शिवाजी पाटील, जयपाल चिंचवाडे, गुंडू एरंडोले, रतिलाल पटेल, दीपक मर्दा, अनंत चिमड, विपूल शहा, हरी गुरव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय बेडगे, राजू नायकवडी, संजय डोडीया, अजित चिमड, राजेंद्र शेटे, राजू पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Satish Malu, President of Krishna Valley Chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.