पीडित लोकांना मुद्देमाल परत करण्याचे समाधान माेठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST2020-12-05T05:04:47+5:302020-12-05T05:04:47+5:30

तासगाव : नरसेवाडी (ता. तासगाव) येथे दोन महिन्यांपूर्वी चाकूचा धाक दाखवून ५० हजार रुपये लुटण्यात आले हाेते. पोलीस ...

Satisfaction to return the goods to the victims | पीडित लोकांना मुद्देमाल परत करण्याचे समाधान माेठे

पीडित लोकांना मुद्देमाल परत करण्याचे समाधान माेठे

तासगाव : नरसेवाडी (ता. तासगाव) येथे दोन महिन्यांपूर्वी चाकूचा धाक दाखवून ५० हजार रुपये लुटण्यात आले हाेते. पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या नेतृत्वाखाली तासगाव पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून साक्षीदार असणाऱ्या महिलेस ५० हजारांची रक्कम न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी सुपूर्त केली. पीडित लोकांना त्यांचा मुद्देमाल परत करणे ही समाधानाची भावना असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी यावेळी व्यक्त केली.

या गुन्ह्यात सचिन रामचंद्र यादव (रा. नरसेवाडी, ता. तासगाव) फिर्यादी हाच आरोपी निष्पन्न झाला होता. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली पन्नास हजारांची रक्कम न्यायालयाच्या आदेशाने साक्षीदारांना परत करण्यात आली. या प्रकरणातील पीडित महिलांनी पोलिसांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. पैसे परत मिळवून दिल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले.

फोटो : ०२ तासगाव १

ओळ : नरसेवाडी (ता. तासगाव) येथील लुटीतील ऐवज तासगाव पाेलिसांनी फिर्यादीस परत केला.

मुद्देमाल परत देताना तासगावचे पोलीस निरीक्षक सावंत्रे.

Web Title: Satisfaction to return the goods to the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.