वाटेगावात पाणीप्रश्नी सरपंचांचा उपाेषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:36+5:302021-07-17T04:21:36+5:30

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील पश्चिम भागातील वाडीभाग परिसरातील रामोशी वस्तीशेजारी असलेल्या ६० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीमध्ये ...

Sarpanch warns of water crisis in Vategaon | वाटेगावात पाणीप्रश्नी सरपंचांचा उपाेषणाचा इशारा

वाटेगावात पाणीप्रश्नी सरपंचांचा उपाेषणाचा इशारा

वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील पश्चिम भागातील वाडीभाग परिसरातील रामोशी वस्तीशेजारी असलेल्या ६० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीमध्ये दिनांक ६ जुलैपासून पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे परिसरातील तीन हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत पाठपुरावा करूनही समस्या कायम असल्याने सरपंच सुरेश साठे व ग्रामपंचायत सदस्य विनाेद जाधव यांनी साेमवार दि. १९ पासून वाळवा पंचायत समितीसमाेर उपाेषण करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांंना दिले आहे.

पाणीपुरवठा सुरळीत हाेण्यासाठी सरपंच सुरेश साठे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत; परंतु गेल्या १० दिवसांत त्यावर काहीही उपाययोजना न झाल्याने सरपंच सुरेश साठे व ग्रामपंचायत सदस्य विनोद जाधव यांनी १७ जुलैपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास सोमवार, दि. १९ जुलैपासून वाळवा पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. यावेळी सरपंच सुरेश साठे, ग्रामपंचायत सदस्य विनोद जाधव, अनिल पाटील, शांतीनाथ शेटे उपस्थित होते.

फोटो : १६ वाटेगाव १

ओळ : वाटेगाव (ता. वाळवा) येथील पाणी प्रश्नाबाबत सरपंच सुरेश साठे, विनोद जाधव यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

Web Title: Sarpanch warns of water crisis in Vategaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.