वाळवा तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत उद्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST2021-02-05T07:19:21+5:302021-02-05T07:19:21+5:30

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ९४ गावातील सरपंच पदांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार, २९ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता काढण्यात येणार ...

Sarpanch of Valva taluka leaving reservation tomorrow | वाळवा तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत उद्या

वाळवा तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत उद्या

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील ९४ गावातील सरपंच पदांच्या आरक्षणाची सोडत शुक्रवार, २९ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी मुदत संपलेल्या मसुचीवाडी आणि भाटवाडी या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या आहेत. तर उर्वरित ९२ गावांच्या निवडणुका या होणार आहेत.

तालुक्यातील एकूण ९४ गावांसाठी सर्वसाधारण २८ आणि सर्वसाधारण महिलांसाठी २८ अशी एकूण ५६ आरक्षणे ही खुल्या गटातून पडतील. इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) सर्वसाधारण १३ तर महिलांसाठी १३ अशी २६ आरक्षणे असतील. अनुसूचित जमाती प्रवर्गातून फक्त एका महिलेसाठी सरपंचपद आरक्षित होईल. अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण गटासाठी ५ आणि महिलांसाठी ६ असे आरक्षण पडणार आहे.

सबनीस म्हणाले की, शुक्रवारी दुपारी तीन वाजता प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. साखराळे रस्त्यावरील जयंत पाटील खुल्या नाट्यगृहातील हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. ज्यांना या आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहण्याची इच्छा आहे, त्यांनी सोडतीवेळी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Sarpanch of Valva taluka leaving reservation tomorrow