तासगाव तालुक्यात ६८ गावांसाठी सरपंच आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:55+5:302021-02-05T07:30:55+5:30

तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार नागेश गायकवाड, प्रभारी नायब तहसीलदार प्रवीण माळवे, मंडल अधिकारी अभय शेटे यांच्यासह पदाधिकारी, विविध ...

Sarpanch reservation announced for 68 villages in Tasgaon taluka | तासगाव तालुक्यात ६८ गावांसाठी सरपंच आरक्षण जाहीर

तासगाव तालुक्यात ६८ गावांसाठी सरपंच आरक्षण जाहीर

तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार नागेश गायकवाड, प्रभारी नायब तहसीलदार प्रवीण माळवे, मंडल अधिकारी अभय शेटे यांच्यासह पदाधिकारी, विविध गावचे सरपंच आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. पूर्वा प्रमोद पाटील या पाच वर्षाच्या मुलीच्याहस्ते चिठ्ठ्या उचलून विविध प्रवर्गाचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. आमदार सुमनताई पाटील यांच्या अंजनी आणि खासदार संजय पाटील यांच्या चिंचणी गावांचे सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.

तालुक्यातील कौलगे आणि जुळेवाडी या दोन गावातील सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे, परंतु या दोन्हीही गावात या प्रवर्गातील सदस्य हे पुरुषच आहेत. यामुळे शासनाचा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत दोन गावातील सरपंचपद रिक्तच राहणार आहे. धुळगाव गावामध्ये खासदार संजय पाटील समर्थक पॅनेलची सत्ता आली आहे. परंतु सरपंचपद राखीव झालेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातील त्यांच्या पॅनेलमधील महिला उमेदवार ही पराभूत झाली आहे. यामुळे बहुमत असूनही या गावात खासदार समर्थक गट सत्तेपासून वंचित राहणार आहे.

प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे...

अनुसूचित जाती : तुरची, दहीवडी, लिंब

अनुसूचित जाती (महिला) : कुमठे, राजापूर, कौलगे, जुळेवाडी

नागरिकांचा मागास प्रवर्ग : आळते, हातनूर अंजनी, गौरगाव, वडगाव, बस्तवडे, चिंचणी, निंबळक, वाघापूर

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : शिरगाव (क), नागाव (नि), सावर्डे, धुळगाव, मांजर्डे, गोटेवाडी, खालसा धामणी, नागाव कवठे, विजयनगर.

सर्वसाधारण : जरंडी, वासुंबे, लोढे, गव्हाण, मोराळे (पेड), कवठेएकंद, बिरणवाडी, नरसेवाडी, धोंडेवाडी, वायफळे, शिरगाव (वि), डोर्ली, खुजगाव, विसापूर, बलगवडे, ढवळी, वंजारवाडी, कचरेवाडी, पानमळेवाडी, यमगरवाडी, हातनोली

सर्वसाधारण (महिला) : वज्रचौंडे, नेहरूनगर, पाडळी, येळावी, सिद्धेवाडी, मणेराजुरी, योगेवाडी, लोकरेवाडी, भैरववाडी, चिखलगोठण, मतकुणकी, सावळज, बेंद्री, पुणदी, निमणी, पेड, बोरगाव, उपळावी, डोंगरसोनी, नागेवाडी, आरवडे, किंदरवाडी

Web Title: Sarpanch reservation announced for 68 villages in Tasgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.