जतला ११६ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची उद्या आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:19 IST2021-02-05T07:19:32+5:302021-02-05T07:19:32+5:30
जत तालुक्यात अनुसूचित जातीकरिता १४ जागा आरक्षित असून, त्यापैकी ७ जागा अनुसूचित जाती महिलांकरिता आरक्षित राहाणार आहेत. अनुसूचित जमातीकरिता ...

जतला ११६ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची उद्या आरक्षण सोडत
जत तालुक्यात अनुसूचित जातीकरिता १४ जागा आरक्षित असून, त्यापैकी ७ जागा अनुसूचित जाती महिलांकरिता आरक्षित राहाणार आहेत. अनुसूचित जमातीकरिता दोन जागा आरक्षित असून, त्यापैकी १ जागा अनुसूचित जमाती महिलाकरिता आरक्षित राहणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता ३१ जागा आरक्षित असून, त्यापैकी १६ जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) करिता आरक्षित राहणार आहेत. उर्वरित ६९ जागा सर्वसाधारण असून, त्यापैकी ३५ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. तालुक्यात बिगर अनुसूचित क्षेत्रातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंच संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार ११६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात येणार आहे.