चिंचणीत संतोष गोसावी यांचा अनोखा निरोप समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:34+5:302021-08-29T04:26:34+5:30
फोटो ओळ : चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या बदलीनंतर त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी सजवलेल्या ...

चिंचणीत संतोष गोसावी यांचा अनोखा निरोप समारंभ
फोटो ओळ : चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्या बदलीनंतर त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी सजवलेल्या जीपमधून मिरवणुक काढत त्यांना निरोप दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : चिंचणी (ता. कडेगाव) येथील पोलीस ठाण्यात एक अनोखा निरोप समारंभ पाहायला मिळाला. साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी चक्क त्यांना सजवलेल्या जीपमध्ये बसवले आणि ती जीप दोरीने ओढली. यावेळी त्यांना निरोप देताना सगळ्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली.
संतोष गोसावी यांची चिंचणी (वांगी) पोलीस ठाण्यातून कडेगाव पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर शुक्रवारी त्यांचा निरोप समारंभ पार पडला. संतोष गोसावी यांनी आपल्या कार्यकाळात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे नागरिकांबरोबरच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात ते लोकप्रिय झाले होते. संतोष गोसावी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कडेगाव पोलीस ठाण्यातून बदली होऊन आलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्याकडे संतोष गोसावी यांनी कार्यभार दिला. त्यानंतर त्यांच्या सर्व पोलीस सहकाऱ्यांनी त्यांच्या वाहनाला दोर लावून तो ओढत आवारात एक फेरी मारली. सहकारी पोलिसांनी अशा प्रकारे अनोख्या पद्धतीने निरोप दिल्याने संतोष गोसावी भावुक झाले होते.