शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात बोरगाव प्रथम, सांगली जिल्हा परिषदेकडून निकाल जाहीर  

By अशोक डोंबाळे | Updated: November 21, 2023 19:12 IST

सांगली : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धेत बोरगाव (ता.कवठेमहांकाळ) प्रथम पटकविला आहे. सांडगेवाडी ...

सांगली : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम जिल्हास्तरीय स्पर्धेत बोरगाव (ता.कवठेमहांकाळ) प्रथम पटकविला आहे. सांडगेवाडी (ता.पलूस) द्वितीय आणि बनेवाडी (ता.वाळवा) व बाणूरगड (ता.खानापूर) ग्रामपंचायतीला विभागून तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी मंगळवारी निकाल जाहीर केला आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा २०२२-२३ या वर्षी झाल्या आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ६० जिल्हा परिषद मतदार संघातील प्रथम आलेल्या ६० ग्रामपंचायतींपैकी गुणानुक्रमे पहिल्या ९ ग्रामपंचायतींची तपासणी केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे अध्यक्षतेखालील समितीमार्फत गावांची तपासणी झाली होती. या स्पर्धेतील लाहीलाही सहभागी गावांनी स्वच्छतेच्या माध्यमातून लाखो रुपयांची विकास कामे लोकसहभागातून केली आहेत. ६० गावांमधून सर्वाधिक स्वच्छता आणि अन्य सुविधा राबविल्यामुळे बोरगावने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकविला. या गावच्या स्पर्धेत असलेल्या सांडगेवाडी गावाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. बनेवाडी आणि बाणूरगड या दोन्ही गावांना तृतीय क्रमांक विभागून दिला आहे.

लाडेगाव, लंगरपेठ, बावची ग्रामपंचायतींनाही पुरस्कारघनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी देण्यात येणारा वसंतराव नाईक पुरस्कार लाडेगाव ता.वाळवा ग्रामपंचायतीने, तर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार लंगरपेठ ता.कवठेमहांकाळ ग्रामपंचायतीने मिळविला आहे. शौचालय व्यवस्थापनाचा आबासाहेब खेडकर पुरस्कार बावची ता.वाळवा ग्रामपंचायतीने पटकविला आहे. या पुरस्काराची घोषणा मुख्य कार्यकारी अधकारी तृप्ती धोडमिसे यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदgram panchayatग्राम पंचायत