संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आदर्शवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:27 IST2021-01-20T04:27:35+5:302021-01-20T04:27:35+5:30
आष्टा : माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा आदर्श राज्यातील इतर संस्थांनी घ्यावा. सहकार, सामाजिक, शैक्षणिक, ...

संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आदर्शवत
आष्टा : माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा आदर्श राज्यातील इतर संस्थांनी घ्यावा. सहकार, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात अण्णासाहेब डांगे यांनी भरीव स्वरूपाचे कार्य केले आहे. त्यांनी आष्ट्याच्या माळरानाचे नंदनवन केले आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
आष्टा येथे संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात श्रीनिवास पाटील बोलत होते. संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अण्णासाहेब डांगे अध्यक्षस्थानी हाेते. श्रीनिवास पाटील म्हणाले, आष्ट्याच्या माळावर फुलवलेले हे नंदनवन अण्णासाहेबांच्या व चिमणभाऊंच्या घामाचे प्रतीक आहे. यावेळी विशेष प्रावीण्य मिळवलेल्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. अण्णासाहेब डांगे म्हणाले, विविध शाखांच्या माध्यमातून संस्थेचा विस्तार सुरू असून अजून त्याचे वटवृक्षात रूपांतर करायचे आहे.
डॉ. महेश इनामदार, डॉ. विनायक गरुड, संघमित्रा सरवदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. एस. आर. जोशी यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव ॲड. चिमण डांगे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष ॲड. संपतराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे खजिनदार विठ्ठलराव मसाई, विश्वनाथ डांगे, सुकुमार लवटे, सत्तू ढोले, कार्यकारी संचालक आर. ए. कनाई, स्नेहा माळी, तेजश्री बोंडे, डॉ. सत्येंद्र ओझा प्रा. अरुण घोडके, दीपक अडसूळ, परेश पाटील, बाळासाहेब चाऊस, सुहास नरुले, दत्ताभाऊ कदम, विजय डांगे, वैशालीताई डांगे, सविताताई डांगे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ए. के. पाटील व सुधीर थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सुनील शिनगारे, एन. डी. सांगले, सुभाष पाटील, विजय पाटील, अजित पाटील, मुकेश अवटी, प्रल्हाद शिरगावे, संदीप कांबळे, अशोक घोरपडे यांनी संयोजन केले.
फोटो : १९ आष्टा २
ओळ : आष्टा येथील डांगे शिक्षण संकुलात आयोजित कार्यक्रमात खासदार श्रीनिवास पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, ॲड. चिमण डांगे, प्रा. आर. ए. कनाई, डॉ. एस. एन. ओझा, सुनील शिनगारे उपस्थित हाेते.