संखच्या ईदगाह मैदान, दफनभूमीत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST2021-05-29T04:21:02+5:302021-05-29T04:21:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : संख (ता. जत) येथे मुस्लीम समाजातर्फे दरीबडची रस्त्यावरील ईदगाह मैदान, दफन भूमीत मुस्लीम बांधवानी ...

संखच्या ईदगाह मैदान, दफनभूमीत वृक्षारोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : संख (ता. जत) येथे मुस्लीम समाजातर्फे दरीबडची रस्त्यावरील ईदगाह मैदान, दफन भूमीत मुस्लीम बांधवानी वृक्षारोपण केले. पर्यावरणाचे भान ठेवत सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळ्या प्रकारचे ७६ फळांची झाडे लावण्यात आले. प्रत्येक झाडाला ठिबक सिंचन केले आहे.
पूर्व भागातील संख येथे मुस्लीम समाजाचे दरीबडची रस्त्यावर ईदगाह मैदान व दफनभूमी हा दोन एकरचा आहे. ईदगाह मैदानात रमझान ईद, बकरी ईद, नमाजपठणसाठी व दफन करण्यासाठी मुस्लीम समाजातील लोक जातात. हा परिसर ओसाड,पडीक आहे. झाडांची संख्या कमी आहे.
दुष्काळ भाग असल्यामुळे झाडे कमी असल्यामुळे पावसाचे प्रमाण कमी आहे. पर्यावरणाचे भान ठेवत सामाजिक बांधिलकी जपत ईदगाह मैदान, दफनभूमीत, मुस्लीम समाजाच्या वतीने सर्व प्रकारची ७६ झाडे लावण्यात आले.
यामध्ये कडुलिंब, चिंच, बदाम, पेरू, आंबा, बकूळ, चेरी, रेन्ट्री, गुलमोहर, जांभूळ, कांचन, कारंजी, संप्तणी, फायकस, अपटा अशाप्रकारचे फळाचे ७६ झाडे लावण्यात आली. झाडांची जोपासना व संर्वधन करण्यासाठी दोन लोखंडी गेट बसविण्यात आले आहे. प्रत्येक झाडाला ठिबक सिंचन पाइपलाइन करण्यात आली. झाडे लावण्यासाठी अनेकांनी मदत केली. यावेळी जमात प्रमुख अब्बास भाई सय्यद, मैनुद्दीन भाई जमादार, मौलाना ईरफान, बुडेसाब करजगी, रमजान शेख, राजू शेख, अब्बास शेख, नबिसाब शेख, मोसिन मुल्ला, रफिक ममदापुर, राजेभक्षर जमादार, मौला (जनाब) शेख, अब्दुल तेग्गेळ्ळी, रमजान जमादार, जाकीर शेख, अलाभक्ष मकानदार, मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित बांधव उपस्थित होते.