संख मध्यम प्रकल्प १५ वर्षांनी भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST2021-05-01T04:25:09+5:302021-05-01T04:25:09+5:30

उन्हाळ्यात संखसह भिवर्गी, करजगी, बेळोडगी, हळ्ळी, सुसलाद व उमदी या सर्व लहान मोठ्या गावांना लाभ हाेणार आहे. यासाठी हळ्ळी ...

Sankh medium project completed after 15 years | संख मध्यम प्रकल्प १५ वर्षांनी भरला

संख मध्यम प्रकल्प १५ वर्षांनी भरला

उन्हाळ्यात संखसह भिवर्गी, करजगी, बेळोडगी, हळ्ळी, सुसलाद व उमदी या सर्व लहान मोठ्या गावांना लाभ हाेणार आहे. यासाठी हळ्ळी येथील शेतकऱ्यांनी उपोषण केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अँड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर, हळ्ळीचे उपसरपंच लोकप्पा नागोंड व शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन समस्या मांडली हाेती. आठ दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले होते. त्याप्रमाणे यंत्राच्या साहाय्याने कालव्यात असलेली झाडे-झुडुपे काढण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी अमोल डफळे, रमेश पाटील, ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर यांच्या हस्ते नारळ फोडून कामाची सुरुवात करण्यात आली. जत तालुका हा कायम दुष्काळी भाग आहे. यामुळे सध्या कालव्याच्या माध्यमातून पाणी आल्यास या गावातील शेतीसाठी व पिण्याचे पाणी जनावरांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यावेळी रेवप्पा पट्टणशेट्टी, बाबूराव नागोंड, कल्लाप्पा हलकुडे, सिद्धाराम खवेकर, अरविंद खवेकर, आदी गावांतील शेतकरी उपस्थित होते.

फाेटाे : ३० उमदी १

Web Title: Sankh medium project completed after 15 years