कृषिरत्न पुरस्काराबद्दल संजीव माने यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:26 IST2021-04-02T04:26:56+5:302021-04-02T04:26:56+5:30
आष्टा येथे कृषिभूषण डॉ. संजीव माने यांना राज्य शासनाचा ‘कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वैभव शिंदे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात ...

कृषिरत्न पुरस्काराबद्दल संजीव माने यांचा सत्कार
आष्टा येथे कृषिभूषण डॉ. संजीव माने यांना राज्य शासनाचा ‘कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वैभव शिंदे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल शिंदे, झुंजारराव पाटील, नितीन झंवर, दिलीप वग्याणी, रघुनाथ जाधव, स्नेहा माळी, संग्राम फडतरे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : कृषिभूषण डॉ. संजीव गणपतराव माने यांनी उसाचे एकरी शंभर ते दोनशे टन उत्पादन वाढविण्यासाठी राज्यात व देशात प्रयत्न केले आहेत. त्यांचे कार्य देशातील सर्व शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार आष्टा शहराचा गौरव वाढवणारा आहे, असे प्रतिपादन राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे यांनी केले.
आष्टा येथील कृषिभूषण डॉ. संजीव गणपतराव माने यांना राज्य शासनाचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी वैभव शिंदे बोलत होते. माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, रघुनाथ जाधव, विशाल शिंदे, उद्योजक नितीन झंवर, नगराध्यक्षा स्नेहा माळी, संग्राम फडतरे, धैर्यशील शिंदे, प्रकाश शिंदे, मनीषा जाधव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.