शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: संजयकाकांनी कोंडी फोडली; रोहित पाटलांचा सस्पेन्स कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 20:16 IST

Local Body Election: तासगावच्या राजकीय पटलावर अद्याप सन्नाटा कायम

दत्ता पाटीलतासगाव : भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वाटचालीबाबत असलेली कोंडी फोडली आहे. मात्र, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम आहे.एकीकडे संजय पाटील यांनी भाजपच्या विरोधातच रान उठवण्यास सुरुवात केली असताना, दुसरीकडे आमदार रोहित पाटील मात्र ‘सायलेंट’ राहून जुळवाजुळव करताना दिसून येत आहेत. दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेमुळे तासगावच्या राजकीय पटलावर अद्याप सन्नाटा कायम आहे.भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी सर्वच राजकीय पक्षांपासून फारकत घेत, ‘विकासाची गाडी’ या संघटनेच्या माध्यमातून निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, हे जाहीर करताना नेमकी कोणासोबत हातमिळवणी करणार, याची स्पष्टता नव्हती. सांगलीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांशी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे संजय काका भाजपच्या विरोधातच निवडणुकीचा अजेंडा राबवत असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट झाले आहे. त्याला भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधाचीदेखील किनार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार रोहित पाटील यांनी एकत्र यावे, असे अप्रत्यक्ष संकेत संजय पाटील यांनी दिले असतानाच, नगरपालिकेची निवडणूक मात्र स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काकांच्या या भूमिकेने त्यांच्या राजकीय दिशेचा अंदाज स्पष्ट झाला आहे. मागील काही दिवसांपासून निवेदने, आंदोलने आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून शासनाच्या विरोधात संजय काका आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे आमदार रोहित पाटील यांनी संजय काकांनी केलेल्या आरोपांना जाहीर उत्तर दिलेले नाही. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.मात्र, सायलेंट राहून पडद्याआडून निवडणुकीची जुळवाजुळव सुरू ठेवल्याचे दिसते. दोन्ही नेत्यांच्या या बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे मतदारसंघातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे तासगाव तालुक्यात निवडणुकीची वारे वाहताना दिसून येत नाहीत.

संजयकाकांच्या निशाण्यावर भाजपसंजय पाटील यांनी वेळोवेळीच्या आंदोलनांमधून आणि पत्रकार परिषदांमधून सत्ताधाऱ्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ऐरणीवर ठेवून त्यांनी भाजपवर घाव घालण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितल्याने भाजपविरोधातील सर्वपक्षीय आघाडीच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Politics: Sanjay Kaka breaks deadlock; Rohit Patil's suspense remains.

Web Summary : Sanjay Patil will contest local elections independently, signaling opposition to BJP. Rohit Patil remains silent, fueling suspense. Alliances uncertain, creating political tension in Tasgaon.