संजयकाकांचे फलक फाडले

By Admin | Updated: May 27, 2014 01:19 IST2014-05-27T01:18:48+5:302014-05-27T01:19:50+5:30

मांजर्डेतील घटना : गाव बंद ठेवून निषेध

Sanjayakaka's flag was torn off | संजयकाकांचे फलक फाडले

संजयकाकांचे फलक फाडले

 मांजर्डे : मांजर्डे (ता. तासगाव) येथे रविवारी रात्री नूतन खासदार संजय पाटील यांचे डिजिटल फलक अज्ञातांकडून फाडण्यात आले. समर्थकांनी सोमवारी गावात चौका-चौकात टायर पेटवून व गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. तालुक्यात गव्हाण येथेही गेल्या आठवड्यात फलक फाडल्याची घटना घडली होती. लोकसभेच्या निवडणुकीत मांजर्डेतून संजय पाटील यांना मताधिक्य मिळाले. पाटील यांचे अभिनंदन व त्यांना शुभेच्छा देणारे डिजिटल फलक गावात अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. हनुमान मंदिरासमोरील दोन फलक रविवारी रात्री अज्ञातांकडून फाडण्यात आले. हा प्रकार सोमवारी सकाळी लक्षात येताच संजय पाटील समर्थक मोठ्या संख्येने हनुमान चौकात एकत्र गोळा झाले. कार्यकर्त्यांनी गावात चौका-चौकात टायर पेटवून निषेध व्यक्त केला. गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. दोषी व्यक्तीस लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर सक्त कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा समर्थकांनी दिला. मांजर्डे येथील कार्यकर्त्यांनी सकाळी तासगाव पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. संशयितांना दि. ४ जूनपर्यंत अटक न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुदीप खराडे व सचिन पाटील, नागेश मोहिते, संभाजी खराडे, हरेश खराडे, पांडुरंग खराडे, नंदकुमार सगरे उपस्थित होते. तासगावचे पोलीस उपनिरीक्षक सुहास घोडके यांनी पाहणी करून पंचनामा केला व त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मांजर्डे येथे शीघ्र कृती दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. येथील गेल्या वर्षभरातील हा तिसरा प्रसंग आहे. पण एकाही प्रकरणात पोलिसांनी दोषी व्यक्तीस पकडलेले नाही. याची गावात चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)

Web Title: Sanjayakaka's flag was torn off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.