शिवणीच्या सरपंचपदी संजय पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST2021-02-10T04:26:07+5:302021-02-10T04:26:07+5:30
वांगी : शिवणी (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय पवार यांची; तर दत्तात्रय चव्हाण यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड केली. ...

शिवणीच्या सरपंचपदी संजय पवार
वांगी : शिवणी (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय पवार यांची; तर दत्तात्रय चव्हाण यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड केली. शिवणी येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्तेत असणाऱ्या भाजपचा धुरळा उडवीत काँग्रेसने नऊपैकी नऊ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले.
निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील याच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या सदस्यांची बैठक झाली. यामध्ये संजय पवार यांची सरपंचपदी, तर दत्तात्रय चव्हाण यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड केली. यावेळी सतीश पवार, राजेंद्र पवार, दिलीप पवार, संतोष जाधव, बाळासो पवार, पोलीस पाटील, बाळासाहेब पवार, दत्तात्रय पवार, शंकर पवार, सुरेश पवार, पांडुरंग दबडे, मोहन पवार, संपत पवार, धैर्यशील पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक उत्तम घाडगे यांनी आभार मानले.
निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली.