शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपा आमदारांचाच विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 06:02 IST

सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपच्या सर्व आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

सांगली : सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपच्या सर्व आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाटील यांच्याविषयीच्या तक्रारींचा पाऊस पडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हैराण झाले.या बैठकीला खासदार संजय पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, आ. विलासराव जगताप, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, लोकसभा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, सांगली लोकसभा संयोजक शेखर इनामदार आदी उपस्थित होते. बैठकीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या रणनीतीविषयी चर्चा सुरू असताना, उमेदवारीवरून बहुतांश पदाधिकारी व सर्व आमदारांनी आक्षेप नोंदविले. उमेदवारी बदलून दिल्यास भाजपमधील नाराजी दूर होऊन भाजपची ही जागा विक्रमी मताधिक्याने निवडून येऊ शकते,अशी खात्रीही व्यक्त करण्यातआली.मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री पाटील यांच्यासमोर संजय पाटील यांनी केलेल्या कुरघोड्या आणि गटबाजीचा पंचनामा करण्यात आला. यातून जिल्ह्यातील भाजपमधील गटबाजी आणि खदखद पुन्हा उघड झाली. मात्र उमेदवारीबाबत बैठकीत कोणताच निर्णय किंवा अंदाज दोन्हीही वरिष्ठ नेत्यांनी येथील पदाधिकाऱ्यांना दिला नाही.सांगली जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारीवरून पक्षाअंतर्गत वाद गेल्या काही दिवसांत वाढला आहे.यांचा विरोधसुरेश खाडे : भाजपा- मिरजशिवाजीराव नाईक : भाजपा- शिराळासुधीर गाडगीळ : भाजपा- सांगलीअनिल बाबर : शिवसेना- खानापूर-आटपाडीपृथ्वीराज देशमुख : भाजपा जिल्हाध्यक्षदोन दिवसांत निर्णय घेऊ - देवेंद्र फडणवीससंजय पाटील यांनी आपले मत मांडताना सर्वांचा आपल्याबद्दल गैरसमज झाल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांसमोर बाजू मांडली. माझ्या भूमिकेमुळे युतीच्या आमदारांना विधानसभेला फायदा होऊ शकतो, असे स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही. दोन दिवसांत यावर निर्णय घेऊ, असे सांगितले.अन्य कुणालाही उमेदवारी द्यापाटील यांच्याविरोधात पदाधिकारी व आमदारांनी ताकद पणाला लावली आहे. त्यांच्याबद्दल पक्षाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. पाच वर्षांत पाटील यांनी पक्षात कोणालाही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य कोणताही उमेदवार पक्षाने द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

टॅग्स :BJPभाजपाSangliसांगलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक