संजयनगरला तरुणावर चाकूने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:13+5:302021-07-21T04:19:13+5:30
अमन विनय भोरे (वय २२, रा. पत्राचाळ, मारुती मंदिराजवळ, संजयनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर संशयित नजीर लाला ...

संजयनगरला तरुणावर चाकूने हल्ला
अमन विनय भोरे (वय २२, रा. पत्राचाळ, मारुती मंदिराजवळ, संजयनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर संशयित नजीर लाला शेख (२४) व गणेश रामचंद्र शिंदे (२८, दोघेही रा. पत्राचाळ) या संशयितांना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमी अमन हा त्याच्या मित्रासह रुक्मिणी हाउसिंग सोसायटीजवळील महापालिकेच्या मोकळ्या जागेत पत्ते खेळत बसला होता. यावेळी संशयित नजीर शेख व गणेश शिंदे हे दोघे तिथे आले. पूर्वीच्या भांडणाचा रा. मनात धरून गणेश याने आज अमनला सोडायचे नाही, असे म्हणाला. त्यावर नजीरने कमरेला लावलेला चाकू काढून अमनच्या पोटात भोसकला. त्याला वाचविण्यासाठी आलेल्या मित्रालाही चाकूचा धाक दाखवून खुनाची धमकी दिली.