इस्लामपूर नगरपालिकेत संजय कोरे अस्वस्थ

By Admin | Updated: September 5, 2014 00:18 IST2014-09-05T00:09:33+5:302014-09-05T00:18:15+5:30

संघर्ष चव्हाट्यावर : पक्षप्रतोद, नगराध्यक्षांच्या कुरघोड्यांचा परिणाम

Sanjay Kore in the city of Islampur is unwell | इस्लामपूर नगरपालिकेत संजय कोरे अस्वस्थ

इस्लामपूर नगरपालिकेत संजय कोरे अस्वस्थ

अशोक पाटील --इस्लामपूर,, एम. डी. पवार यांची सत्ता उलथवून टाकल्यापासून इस्लामपूर नगरपालिकेवर उरुण परिसरातील पाटलांचे वर्चस्व आहे. नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोणीही असो, कारभार मात्र पाटील मंडळीच करीत असतात. पालिकेच्या सभागृहात आणि कारभारात वचक ठेवून राजकीय खेळी करण्यात हातखंडा असलेले पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांचे समर्थक सुभाष सूर्यवंशी सध्या नगराध्यक्षपदावर आहेत, तर एन. ए. गु्रपचे संजय कोरे उपनगराध्यक्ष आहेत. परंतु कोरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांतीलच काही मंडळी कुरघोड्या करत असल्याने ते सध्या अस्वस्थ आहेत.
पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असल्यापासून जे नगराध्यक्ष झाले, त्यातील बहुतांशी नगराध्यक्षांचा कारभार विजयभाऊ पाटील यांनीच पाहिला आहे. सध्याही अशीच परिस्थिती आहे. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचे मार्गदर्शन असले, तरी पक्षप्रतोद हेच प्रशासनातील निर्णय घेत असतात. काहीवेळा संघर्षही चव्हाट्यावर आले आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष महादेव कोरे, शिवाप्पा सांभारे, वाय. एस. जाधव, मुनीर पटवेकर, सुधीर पिसे, सौ. शारदा पाटील या नगराध्यक्षांवेळी राष्ट्रवादीतीलच काहींनी अडथळे निर्माण केले होते, तर अशोकदादा पाटील, आनंदराव मलगुंडे, पै. भगवान पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, सौ. अरुणादेवी पाटील या नगराध्यक्षांना मात्र पक्षप्रतोद विजयभाऊ गटाने सहकार्याची भूमिका घेतली होती.
नगराध्यक्ष सूर्यवंशी हे विजयभाऊ पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. उपनगराध्यक्ष पदही विजयभाऊ गटाला हवे होते. परंतु एन. ए. गु्रपने आक्रमक भूमिका घेऊन संजय कोरे यांना उपनगराध्यक्षपद मिळवून दिले. हे पद मिळाल्यापासून कोरे नगराध्यक्ष दालनात अनेकवेळा अनुपस्थित असल्याचे दिसत आहे. पालिकेतील काही सभांनाही त्यांची उपस्थिती नव्हती. दैनंदिन कारभारात विजयभाऊ पाटील आणि नगराध्यक्ष सूर्यवंशी यांच्या कुरघोड्यांमुळे ते अस्वस्थ असल्याचे दिसत आहेत.

कोरेंची सभांना दांडी
एन. ए. गु्रपने आक्रमक भूमिका घेऊन संजय कोरे यांना उपनगराध्यक्षपद मिळवून दिले. हे पद मिळाल्यापासून कोरे नगराध्यक्ष दालनात अनेकवेळा अनुपस्थित असल्याचे दिसत आहे. पालिकेतील काही सभांनाही त्यांची उपस्थिती नव्हती.

कार्यक्रमपत्रिकेतून नाव वगळले
इस्लामपूर पालिकेच्यावतीने दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत उपनगराध्यक्ष व शिक्षण सभापती या नात्याने संजय कोरे यांचे नाव असणे गरजेचे होते; परंतु या पत्रिकेत कोरे यांच्या नावाला बगल देण्यात आली आहे. यावरूनच कोरे यांच्याविरोधात कुरघोड्याचे राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे.
४कोरे पहिल्यापासूनच सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराज आहेत. त्यांनी यापूर्वी राजीनामाही दिला होता. शहरातील विकासकामे निकृष्ट दर्जाची आहेत. पालिकेत ठेकेदारांची मक्तेदारी असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे कोरे नाराज असल्याने ते खुर्चीपासून दूरच राहणे पसंत करत आहेत.

Web Title: Sanjay Kore in the city of Islampur is unwell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.