संजय जाधव यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:25 IST2021-04-10T04:25:54+5:302021-04-10T04:25:54+5:30

कामेरी (ता. वाळवा) येथे प्रा. संजय जाधव हे सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल वाळवा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत ...

Sanjay Jadhav felicitated | संजय जाधव यांचा सत्कार

संजय जाधव यांचा सत्कार

कामेरी (ता. वाळवा) येथे प्रा. संजय जाधव हे सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल वाळवा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी सत्कार केला. यावेळी अध्यक्ष भगवान कदम, शैला पाटील, हंबीरराव जडगे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे कर्मवीर शिक्षणसंस्था अभ्यास केंद्राच्या शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रमाचे केंद्राचे संयोजक प्रा. संजय जाधव हे शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल वाळवा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कर्मवीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कन्या शाळेच्या मुख्याध्यापक शैला पाटील, आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक हंबीरराव जडगे, वैभव पाटील, सुधीर खंडागळे, अतुल कदम उपस्थित होते. तसेच तिन्ही शाखांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Sanjay Jadhav felicitated