कवठेमहंकाळ तालुका काँग्रेसचे संजय हाजारे अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:10+5:302021-02-06T04:49:10+5:30

तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत ही एकमताने निवडी जाहीर करण्यात आल्या. विद्यमान तालुका अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या ...

Sanjay Hazare, President of Kavthemahankal Taluka Congress | कवठेमहंकाळ तालुका काँग्रेसचे संजय हाजारे अध्यक्ष

कवठेमहंकाळ तालुका काँग्रेसचे संजय हाजारे अध्यक्ष

तालुका काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत ही एकमताने निवडी जाहीर करण्यात आल्या.

विद्यमान तालुका अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या आकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही निवड करण्यात आली. तालुक्यातील रखडलेल्या जलसिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी व महसूल विभागाकडून मिळणाऱ्या दाखल्यासाठी होणाऱ्या जनतेच्या पिळवणुकी विरोधात लवकरच पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, तर सदस्यांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र राहून पक्ष वाढीसाठी मेहनत घेणार आसल्याचे संजय हाजारे यांनी सांगितले. आभार चैतन्य पाटील यांनी आभार मानले.

यावेळी माणिकराव भोसले, बाळासाहेब गुरव, धनाजी पाटील, विजय ओलेकर, आल्लाबक्ष मुल्ला, राजाराम घोरपडे, प्रा.दादासाहेब ढेरे, वैभव गुरव, रावसाहेब शिंदे, सुशांत शिंदे, कृष्णदेव आदी उपस्थित होते.

फोटो-०५घाटनांद्रे१

फोटो ओळी:- कवठेमहंकाळ येथे काँग्रेस पक्षाच्या तालुका नूतन अध्यक्षपदी संजय हाजारे व कार्याध्यक्षपदी अविराजे शिंदे यांचा निवडीनिमित्त माणिकराव भोसले, बाळासाहेब गुरव सत्कार करण्यात आला.

Web Title: Sanjay Hazare, President of Kavthemahankal Taluka Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.