सांगलीत दोड्डमणीचा मटका अड्डा उदध्वस्त
By Admin | Updated: November 23, 2014 00:42 IST2014-11-23T00:42:45+5:302014-11-23T00:42:45+5:30
एजंटास अटक : बुकीमालक फरारी

सांगलीत दोड्डमणीचा मटका अड्डा उदध्वस्त
सांगली : शहरातील कुरणे चौकात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला फिरता मटका अड्डा विशेष पोलीस पथकाने आज, शनिवार छापा टाकून उदध्वस्त केला. या छाप्यात एजंट रामचंद्र नामदेव शिंदे (वय ४५, रा. शिकलगार गल्ली, सांगली) यास अटक केली आहे. बुकीमालक काशिनाथ यल्लाप्पा दोड्डमणी हा आहे. त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला असून, तो फरारी असल्याचे सांगण्यात आले.
कुरणे चौकात दुचाकीवरुन फिरुन मटका घेत असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांना मिळाली होती. सावंत यांनी विशेष पथकास कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने बोगस ग्राहक पाठविले. शिंदे हा मटका घेत असल्याची खात्री पटताच पथकाने छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताच शिंदे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्याला पकडण्यात आले. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने काशिनाथ दोड्डमणी याच्या सांगण्यावरुन मटका घेत असल्याची कबुली दिली. यामुळे दोड्डमणीचा शोध सुरु ठेवला आहे. (प्रतिनिधी)