सांगलीचा समीर कठमाळे अपराजित

By Admin | Updated: June 11, 2016 00:30 IST2016-06-10T23:29:14+5:302016-06-11T00:30:50+5:30

नऊ सामन्यांत सलग विजय : वरदराज मेमोरियल बुद्धीबळ स्पर्धेत यश

Sangli's Sameer Kadamale Aparajit | सांगलीचा समीर कठमाळे अपराजित

सांगलीचा समीर कठमाळे अपराजित

सातारा : येथील छ. जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या राष्ट्रीय खुल्या जलदगती बुद्धीबळ स्पर्धेचे विजेतेपद सांगलीच्या इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे याने ९ सामन्यात ९ गुण मिळवत शेवटपर्यंत अपराजित राहत जिंकले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत एकूण सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे, सोलापूर, चेन्नई, बेळगाव, नाशिक, परभणी, नागपूर येथून एकूण २०० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये वयोवर्षे ४ ते ६० वर्षांपर्यंतच्या खेळाडूंनी तसेच अग्रमानांकित खेळाडू इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाळे (सांगली) व पुण्याचे फिडे मास्टर आर. एस. गुप्ता यांच्यासह ९० आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंनी आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, ज्येष्ठ बुद्धीबळ खेळाडू अशोक लढ्ढा, सातारा जिल्हा बुद्धीबळ असो. चे अध्यक्ष जयंत उथळे, प्रशांत शिंगटे, विशाल कणसे व कुटुंबीय आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
पंच म्हणून राष्ट्रीय पंच प्रणव टंगसाळे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सातारा चेस फॅन क्लबच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. पौर्णिमा उपळाविकर यांनी सूत्रसंचालन केले. पूनम जाधव यांनी आभार मानले.
स्पर्धेतील गटनिहाय विजेते खालीलप्रमाणे : खुला गट : समील कठमाळे, शंतनू भांबुरे, राहुल सामानगडकर, उत्कर्ष लोमटे, आर. एस. गुप्ता, उमेश कुलकर्णी, रोहन जोशी, केतन खैरे, ओंकार कडव, इम्रान शिकलगार, हेमंतकुमार मांढरे, गोपाळ राठोड, महेशकुमार भिंताडे, सागर मोहिते, कुणाल मापुसकर. ७ वर्षांखालील : तनय फडणीस, आरुष खोराटे, अवनीश हान्डूर, चैत्राली जाधव, सौम्या कुलकर्णी. ९ वर्षांखालील : निशित बलदवा, दीपांषु पाटील, सर्वेश काटकर, आदित्य भोसले, यश भागवत. ११ वर्षांखालील : ज्योतिरादित्य जाधव, समृद्धी कुलकर्णी, सारंग पाटील, मयुरेश मगदूम, प्रणव गुनके. १३ वर्षांखालील : ईशा कोळी, चेतन पोटे, ओम चोरडिया, ओम सुर्वे, अभिजित भोसले.
१५ वर्षांखालील : मिहीर जोशी, योगेश भट, मृणालिनी घाडगे, अथर्व चव्हाण, चेतन मुटगेकर. १९ वर्षांखालील : प्रिन्स जैसवाल, ऋषिकेश भिलारे, अनिष भोसले. (प्रतिनिधी)

Web Title: Sangli's Sameer Kadamale Aparajit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.