शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

सांगली कोठडीत खून : मृत अनिकेत कोथळेच्या मुलीचे सुजाता पाटील यांनी स्विकारले पालककत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 15:03 IST

पोलिस कोठडीत खून झालेल्या मृत अनिकेत कोथळे याची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचे पालकत्व हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील यांनी शनिवारी दुपारी स्विकारले. शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. एकीकडे खाकी वर्दीतील सैतानांनी अनिकेतचा खून केला; पण याच खार्की वर्दीतील सुजाता पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

ठळक मुद्देखार्की वर्दीतील सुजाता पाटील यांनी घडविले माणुसकीचे दर्शन प्रांजल तीन वर्षाची मुलगी, पित्याचे छत्र हरपल्याने झाली पोरकी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे मागितली परवानगी

सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या मृत अनिकेत कोथळे याची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचे पालकत्व हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील यांनी शनिवारी दुपारी स्विकारले. शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च त्यांनी उचलला आहे. एकीकडे खाकी वर्दीतील सैतानांनी अनिकेतचा खून केला; पण याच खार्की वर्दीतील सुजाता पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळेला लुटमारीच्या गुन्ह्यात अटक केली. गुन्हा कबूल करण्यासाठी त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता.

याप्रकरणी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजण अटकेत आहेत. अनिकेतला प्रांजल ही तीन वर्षाची मुलगी आहे. पित्याचे छत्र हरपल्याने ती पोरकी झाली आहे. राज्य शासनाने कोथळे कुटुंबास दहा लाखांची मदत केली.

आरोपींना अटक झाली. त्यांना शिक्षा होईल; पण अनिकेतचे कुटुंब व मुलीचे काय? त्यांनी जगायचं कसं? असा प्रश्न होता. त्याचवेळी हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी प्रांजलचे पालकत्व स्वीकारण्यास पुढाकार घेतला. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे त्यांनी परवानगीही मागितली होती.शनिवारी दुपारी सुजाता पाटील संपूर्ण कुटूंबासह सांगलीत दाखल झाल्या. त्यांनी कोथळे कुटूंबाची भेट घेतली. अनिकेतची पत्नी व आईकडून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. प्रांजलला कडेवर उचलून घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारारांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, अनिकेतच्या बाबतीत घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. त्याच्या मृत्यूमुळे कुटूंबाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अनिकेतची पत्नी, आई व मुलगी रस्त्यावर आली आहे. त्यांना कुठेही काहीही कमी पडू नये. पैशाअभावी मुलीची फरफट होऊ नये, शिक्षणापासून ती वंचित राहू नये, यासाठी मी तिचे पालककत्व स्विकारले आहे. तिच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च उचलणार आहे.

महिन्यालाही काही रक्कम खर्चासाठी देणार आहे. अनिकेती पत्नी संध्या ही माझी लहान बहिण म्हणून मी तिला सर्वतोपरी मदत करेन. माझे चिखली (जि. कोल्हापूर) सासर आहे. अधून-मधून मी प्रांजलची भेट घेण्यास येईन.

२५ हजाराची मदतसुजाता पाटील यानी अनिकेतची पत्नी संध्या यांना २५ हजाराचा धनादेश दिला. ही रक्कम तिला काही अडचण निर्माण झाल्या ती कधीही शकते. 

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणSangliसांगली