कडेगाव : सांगलीत पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या सहकाºयांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी कोथळेचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला. खाकी वर्दीला काळिमा फासणाºया आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आमदार पतंगराव कदम यांनी गृह विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्याकडे केली.
मुंबई येथे मंत्रालयात कदम यांनी गृह विभागाचे मुख्य सचिव श्रीवास्तव यांची भेट घेऊन चर्चा केली. त्याबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, कामटे आणि त्याच्या सहकाºयांनी अतिशय क्रूर कृत्य केले आहे. जिल्ह्यात अवैध दारू विक्री, मटका, सावकारी असे धंदे राजरोस सुरू आहेत. चोºया, दरोडे, बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहेत. हप्ते घेणारे, गुन्हेगारांना आश्रय देणारे, कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले पोलिस अशी पोलिसांची प्रतिमा झाली आहे, सांगलीतील घटनेने पोलिसांची बदनामी झाली आहे. यामुळे राज्याच्या गृह विभागाने कठोर पावले उचलून सांगली पोलिस प्रशासनात योग्य ते बदल केले पाहिजेत, असे गृह सचिवांना सांगितले आहे.
खरे गुन्हेगार, गँगवॉरमधील गुंड पोलिसांना सापडत नाहीत आणि निष्पाप व्यक्तींवर मस्तवाल अधिकारी दादागिरी करतात. जनतेची विश्वासार्हता पोलिसांनी गमावली आहे.


ठोस उपाययोजना!
गृह विभागाचे सचिव श्रीवास्तव यांनी गृह विभागाच्या संबंधित प्रमुख अधिकाºयांशी तात्काळ संपर्क साधला. याबाबत स्वत: लक्ष घालून योग्य त्या ठोस उपाययोजना तात्काळ करीत असल्याचे आश्वासन त्यांनी कदम यांना दिले.

मुंबई येथे गृह विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्याशी सांगली घटनेबाबत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी गुरुवारी चर्चा केली.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.