पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत सांगलीचा झेंडा
By Admin | Updated: March 14, 2015 00:00 IST2015-03-13T23:15:00+5:302015-03-14T00:00:48+5:30
निकाल जाहीर : राजश्री शिंदे २७ वी

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत सांगलीचा झेंडा
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यंदाही जिल्ह्यातील २५ हून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळविले. बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेला निकाल आज, शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्यातील जयदीप पाटील हा राज्यात १८ वा, तर मीनाक्षी माळी ही ओबीसीमध्ये राज्यात २० वी आली आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता असलेल्या राज्यातील ७१४ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. २५ आॅगस्ट २०१३ रोजी पूर्वपरीक्षा, तर ८ डिसेंबर २०१३ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. शारीरिक चाचणी परीक्षा २८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर २०१४ या कालावधित घेण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यशाचा आलेख कायम ठेवला आहे. आष्टा येथील नेताजी स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी केंद्रातील रघुनाथ शिंदे, अवधूत शिंदे, विशाल पाटील, रितेश माळी, सागर पवार, जयदीप पाटील, बसवराज माळी, गणेश कोल्हाळ, शुभांगी जगताप, प्रगती पाटील यांनी यश मिळविले.इस्लामपूर येथील महाराष्ट्र अॅकॅडमीतील पोपट काशीद, मीनाक्षी माळी, दीपाली थोरबोले, विजय सुतार, प्रदीप जाधव, सूर्यकांत सपताळे (एससी मध्ये राज्यात २१ वा) यांनी, तर राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्रातील रोहित फारणे, किरण मगदूम, स्वप्नील पाटील, अमिन पाटील, अर्चना चिवटे, सुषमा उगळे, पूनम जगताप यांनी यश संपादन
केले.
त्याचप्रमाणे तासगाव तालुक्यातील अंजनी येथील राजश्री शिंत्रे (राज्यात २७ वी), विट्यातील अमोल खटावकर, सुषमा शितोळे यांनीही यश मिळविले. (प्रतिनिधी)