राज्य नाट्य स्पर्धेत सांगलीची बाजी
By Admin | Updated: March 17, 2015 00:07 IST2015-03-16T23:09:38+5:302015-03-17T00:07:08+5:30
निकाल जाहीर : ‘एक चादर मैलीसी’ला बक्षिसे

राज्य नाट्य स्पर्धेत सांगलीची बाजी
सांगली : चोपन्नाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये सांगलीतील प्रकाश गडदे लिखित आणि दिग्दर्शित ‘एक चादर मैलीसी’ या नाटकाने बाजी मारली आहे. रंगभूषेचे प्रथम पारितोषिक तसेच उत्कृष्ट अभिनयाकरिता देण्यात येणारी स्त्री आणि पुरुष गटातील दोन्ही पारितोषिके नाटकातील कलाकारांनी पटकावली आहेत.
शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रतिवर्षी नाट्य स्पर्धा घेतली जाते. त्यामध्ये राज्यातील एकवीस नाटकांची निवड झाली होती. सांगली केंद्रातून यंदा पंजाबी संस्कृतीवर आधारित ‘एक चादर मैलीसी’ या नाटकाचा समावेश होता.
१६ फेबु्रवारी ते १३ मार्च २०१५ या कालावधित क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे झालेल्या अंतिम फेरीत सर्व नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. यामध्ये रंगभूषेचे १५ हजाराचे प्रथम पारितोषिक प्रशांत कुलकर्णी यांनी मिळविले, तर उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक पुरुष विभागात राज साने यांनी, तर स्त्री विभागात शिवानी घाटगे यांनी पटकावले. विजेत्यांचा जूनमध्ये मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. परीक्षक म्हणून प्रेमानंद गज्वी, सुरेश मगरकर, संजीव वढावकर, अजय टिल्लू, मंगेश बनसोड यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
ेरंगकर्मींचे यश
रंगभूषेचे १५ हजारांचे प्रथम पारितोषिक प्रशांत कुलकर्णी यांनी मिळविले, तर उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक पुरुष विभागात राज साने यांनी, तर स्त्री विभागात शिवानी घाटगे यांनी पटकावले.