शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

रावसाहेब दानवेंविरुद्ध सांगलीत उद्रेक

By admin | Updated: May 12, 2017 23:14 IST

रावसाहेब दानवेंविरुद्ध सांगलीत उद्रेक

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सांगलीत शुक्रवारी दुसऱ्यादिवशीही उद्रेक झाला. शिवसेनेने याचा निषेध करीत स्टेशन चौकात मुंडण आंदोलन केले, काँग्रेसने काँग्रेस भवनसमोर दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने कार्यालयासमोर निदर्शने केली. तूर खरेदीवरुन दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण राज्यभरातून निषेध होत आहे. गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगलीत दानवेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर शुक्रवारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसही दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरली. शिवसेनेच्यावतीने स्टेशन चौकातील गणेश मार्केटसमोर मुंडण आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांमुळे कृषिप्रधान देश टिकून आहे. शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत. पण दानवेंना शेतकऱ्यांविषयी कळवळा दिसत नाही. यातूनच त्यांनी चित्रपटातील अभिनेत्यासारखा शेतकऱ्यांबद्दल ‘डायलॉग’ मारला. दुष्काळ व कर्जामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यांना आधार देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम दानवेंनी केले आहे, असा अरोप करत याचा निषेध म्हणून सेनेने दानवेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांचे श्राद्ध घालीत मुंडण आंदोलन केले. या आंदोलनात महादेव मगदूम, जितेंद्र शहा, संदीप शिंत्रे, अशोक कासलीकर, आदिनाथ अजेटराव, प्रभाकर कुरळपकर, सचिन ढेरे, संजय जाधव आदी सहभागी झाले होते.काँग्रेसतर्फे काँग्रेस भवनसमोर दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध करण्यात आला. यावेळी निदर्शनेही करण्यात आली. सत्तेची हवा डोक्यात असल्याने दानवेंची शेतकऱ्यांना शिवी देण्यापर्यंत मजल गेली आहे. दानवे व सत्ताधारी भाजपने राज्यातील शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या तुरीला योग्य भाव दिला नाही, तर काँग्रेस गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल. दानवेंनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असा कार्यकर्त्यांनी इशारा दिला. या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, कय्युम पटवेगार, रफीक मुजावर, राजन पिराळे, पैगंबर शेख आदी सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे पक्षाच्या जिल्हा कार्यालयासमोर दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करुन निदर्शने करण्यात आली. दानवे भाजपमध्ये मोठ्या पदावर आहेत. एका संस्कारित पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी त्यांना केलेली शिवीगाळ अत्यंत तिरस्करणीय असल्याचा आरोप महिलांनी केला. या आंदोलनात सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्षा डॉ. छाया जाधव, जयश्री सावंत, अनिता पांगम, आयेशा शेख, वंदना चंदनशिवे, कांचन पळसे, लता कुकडे, मीनाक्षी आरते, लक्ष्मी गडकरी, नलिनी सपाटे, उषा पाटील, कविता पाटील, अरुणा खेमलापुरे आदी सहभागी झाले होते.