शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

सांगलीत नगरसेवकाचे शोलेस्टाईल आंदोलन, महापालिकेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:34 IST

पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणा देत शुक्रवारी सांगलीतील गुलाब कॉलनीच्या पाण्याच्या टाकीवर चढत नगरसेवक राजू गवळी यांच्या नेतृत्वाखाली शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसांगलीत नगरसेवकाचे शोलेस्टाईल आंदोलनमहापालिकेचा निषेधगुलाब कॉलनी परिसरात अपुरा पाणीपुरवठा गळती, स्वच्छतेच्या कामावरून अपुरा पुरवठा : उपाध्ये

सांगली :  पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अशा घोषणा देत शुक्रवारी सांगलीतील गुलाब कॉलनीच्या पाण्याच्या टाकीवर चढत नगरसेवक राजू गवळी यांच्या नेतृत्वाखाली शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी महापालिकेच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या. कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांना घेरावही घालण्यात आला. अखेर येत्या चार दिवसांत या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.सांगली शहरातील गुलाब कॉलनी, त्रिमुर्ती कॉलनी, शंभरफुटी रस्ता, रामकृष्ण परमहंस सोसायटी या परिसरात गेल्या सात दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा पाणीच येत नसल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू गवळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.गुलाब कॉलनीतील पाण्याच्या टाक्यावर नगरसेवक गवळी व नागरिक चढले. तब्बल दोन तास घोषणाबाजी सुरू होती. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये आंदोलनस्थळी आले. त्यांनी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांनी त्यांना दाद दिली नाही. पाण्याच्या टाक्यावरून खाली उतरण्याची विनंतीही फेटाळली. अखेर उपाध्ये स्वत:च पाण्याच्या टाकीवर चढले. तिथे नगरसेवक गवळी व नागरिकांची समजूत काढून त्यांना खाली आणले.याबाबत राजू गवळी म्हणाले की, गेल्या सात दिवसांपासून या परिसरात पाण्याचा पुरवठा खंडीत झाला आहे. महापालिकेचे उपअभियंता संजय धर्माधिकारी यांना वारंवार सांगूनही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. धर्माधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यानेच आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. कार्यकारी अभिंयता उपाध्ये यांनी चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली आहे. त्यानंतरही पाणी आले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.

गळती, स्वच्छतेच्या कामावरून अपुरा पुरवठा : उपाध्येमहापालिकेने हिराबाग, जलभवन येथील पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे. हिराबाग येथील दुरुस्तीचे काम १९ तास चालले. त्यानंतर नदीकाठावरील जॅकवेलच्या वाहिनीला गळती लागली. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे गुलाब कॉलनीतील पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरू शकली नाही.

महापालिकेने संप व पंपातील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे काही भागात अपुरा पुरवठा होत आहे. तर काही भागात पाणीच गेलेले नाही. अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. संजय धर्माधिकारी यांनी या परिसरातील पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना समज दिली जाईल, असे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी सांगितले. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSangliसांगलीWaterपाणी