सांगलीत ‘काँग्रेस सेवा दल क्रीडा’ पुरस्कार प्रदान
By Admin | Updated: November 27, 2015 00:08 IST2015-11-26T22:55:39+5:302015-11-27T00:08:38+5:30
क्रीडा संघटक व खेळाडूंना ‘क्रीडा’ पुरस्काराने सन्मानित

सांगलीत ‘काँग्रेस सेवा दल क्रीडा’ पुरस्कार प्रदान
सांगली : सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलातर्फे जिल्ह्यातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक व खेळाडूंना ‘क्रीडा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार विजेते असे : क्रीडाभूषण : विशाल कांबळे, गौतम शिर्के व भगीरथ राठोड (तिघे शरीरसौष्ठव, मोहिनी चव्हाण (वेटलिफ्टिंग). आदर्श क्रीडा मार्गदर्शक : पारिजात नातू (बॅडमिंटन), प्रताप पाटील (चॉकबॉल), मणी गौडा (कराटे), विजयकुमार कुंभार (टेनिस बॉल क्रिकेट), अधिक पाटील (बुडो), अजित पाटील (क्लॅप स्केटिंग), नामदेव शिंदे (स्पीड बॉल), हामजेखान मुजावर (किक बॉक्सिंग), दत्ता पाटील (नौकायन), सुरेश चौधरी (तायक्वांदो), सुदर्शना पाटील (आईस हॉकी).
आदर्श क्रीडा संघटक : राजेंद्र पाटील (हॉकी), प्रशांत भगत (कबड्डी), हणमंत मोरे (कुस्ती), नागा घुगरे (योगा), सुशांत चव्हाण (क्लॅप स्केटिंग) क्रीडारत्न : शुभम जाधव (तलवारबाजी), रूपाली पाटील (थाय बॉक्सिंग), रसिका यादव (अॅथलेटिक), अजिंक्य पाटील (टेनिसबॉल क्रिकेट), समर्थ नवाळे (कराटे), सोमी सोमराज (बॉक्सिंग), शुभम पाटील (सिकई), वैष्णवी नवाळे (जितक्वांदो), धनश्री पेटकर (किक बॉक्सिंग), विजया दुधणी व सुषमा चंदनशिवे (दोघी तायक्वांदो). विश्वविक्रमी स्केटिंगपटू : मैत्रई पाटील, स्वप्नील ठोंबे, पलक प्रताप, अमृता गायकवाड, अनिश पाटील, सानिधी गाडे. आशियाई पदक विजेते चॉकबॉलपटू : विजयालक्ष्मी खोत, मुस्कान कागजी, लोकेश पटेल.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैजला पाटील, माजी महापौर कांचन कांबळे, ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंदराव मोहिते, मनपा स्थायी समिती सभापती संतोष पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अजित ढोले, प्रकाश जगताप, पैगंबर शेख, मौलाअली वंटमुरे यांनी संयोजन केले. (क्रीडा प्रतिनिधी)